मुंबई : लोकसभेला २२ आणि विधानसभेला १२६ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होऊ शकते, पण सूत्र बदलता कामा नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय कमजोर नाही, असं शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी भाजपला ठणकावून सांगितलेभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ५० जागा सोडण्याबाबत वक्तव्य केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर कीर्तिकरांनी भाष्य केलं. “शिवसेना-भाजप यांनी २०१९ मध्ये युती करुन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. लोकसभेला भाजपने २६, तर शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. विधानसभेला आम्ही १२६, तर भाजपने १६२ जागांवर उमेदवार दिले होते. हा फॉर्म्युला कायम राहिला पाहिजे. लोकसभेला २२ आणि विधानसभेला १२६ जागा आमच्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होईल, पण आकडे बदलले जाणार नाहीत. एकनाथ शिंदेंची शिवसेना कमजोर नाही, असं गजानन कीर्तिकर म्हणाले

आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होतो. मात्र, मधल्या काळात आम्ही फारकत घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रतिनिधी ‘एनडीए’मध्ये जावा, यासाठी संजय राऊत यांची हकालपट्टी करुन माझी संसदीय नेतेपदी नेमणूक करण्यात आली, असं कीर्तिकर म्हणाले.

‘वडिलांना कुस्ती सोडावी लागली होती कारण…’ महाराष्ट्र केसरी ठरल्यावर प्रतिक्षा झाली भावूक
उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा आम्हाला त्रास होत होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. आमच्या मनातील जी शिवसेना होती, त्यापासून उद्धव ठाकरे फारकत घेत होते. ठराविक लोकांनी उद्धव ठाकरेंना घेरले होते, तेच त्यांचे सल्लागार होते. या गोष्टीचा अनुभव मला आलेला. मात्र, माझा मुलगा अमोल याने हा अनुभव घेतला नव्हता, त्यामुळे त्याने उद्धव ठाकरेंसोबत राहायचं ठरवलं. राष्ट्रवादीसोबत जाणं घातक वाटत असल्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो, असे स्पष्टीकरण कीर्तिकर यांनी दिलं.

राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, महाराष्ट्र काँग्रेसमधील बड्या नेत्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here