मुंबई : गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित सोहळ्यामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर होते. या कार्यक्रमात आशा भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं.

आशा भोसले यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त केलं. मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यावर तिचं कौतुक होतं, तसं मला आज वाटतंय. डोक्यावरुन, पाठीवरु मायेचा हात फिरवतायत. महाराष्ट्राची मुलगी असून आज मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, असं आशा भोसले म्हणाल्या.

मनोगत व्यक्त असताना आशा भोसले यांनी पोडियमला लावलेली फुलं काढता येतील का असं विचारलं. त्या म्हणाल्या मला हे पण दिसतं नाही आणि ते पण दिसतं नाही. हे काढता येईल का सर्व, असं आशा भोसले यांनी विचारलं आणि देवेंद्र फडणवीस तिथं आले. उपमुख्यमंत्र्यांनी काढून देऊ का असं विचारलं आणि पोडियमला लावलेली फुलं काढण्यास सुरुवात केली.

वृक्षलागवडीची चर्चा युतीवर घसरली, मुनगंटीवार आणि ठाकरेंचे एकमेकांना टोले

आशा भोसले यांनी त्यांचं पहिलं गाण वयाच्या १० व्या वर्षी म्हणजेज १९४३ मध्ये रेकॉर्ड केल्याचं सांगितलं. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं पण आजपर्यंत उभी राहून गाण म्हणतेय, यापुढंही गात राहीन, असं आशा भोसले म्हणाल्या.

प्रतिक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, वैष्णवी पाटीलवर केली मात

महाराष्ट्र भूषण मिळालाय हा भारतरत्न आहे. माझ्या घरातून मिळालेलं आहे हे मोठं आहे. ९० वर्षांपर्यंत थांबलेय, असं आशा भोसले म्हणाले.

आशा भोसले यांनी यावेळी दत्ता डावजेकर, सुधीर फडके, वसंत प्रभू, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव, श्रीधर फडके, लता मंगेशकर आणि ह्रदयनाथ मंगेशकर, आरती प्रभू, पी. सावळाराम, सुधीर मोघे, ग.दि. माडगूळकर यांच्या नावाचा उल्लेख केला. या लोकांनी गाण्याचं जीवन समृद्ध केलं, असं आशा भोसले म्हणाल्या.

‘वडिलांना कुस्ती सोडावी लागली होती कारण…’ महाराष्ट्र केसरी ठरल्यावर प्रतिक्षा झाली भावूक

मी फक्त मराठीचं नाही तर भारताची कन्या असल्याचं आशा भोसले म्हणाल्या. आशा भोसले यांनी हिंदी संगीत दिग्दर्शक आणि गीतकारांना देखील विसरु शकणार नाही, असं आशा भोसले यांनी म्हटलं.

५० नाही, विधानसभेला १२६ जागा सोडाव्याच लागतील, कीर्तिकरांनी भाजपला ठणकावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here