उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथील बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावना भडकावणारे भाषण आणि भावना दुखावल्याच्या आरोपाखाली धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रशील ठाकूर यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, गुरुवारी उदयपूरच्या गांधी मैदानावर आयोजित धर्मसभेत कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी कथित प्रक्षोभक भाषण केले होते, असे ठाकूर यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर हातीपोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेतकाय म्हणाले होते धीरेंद्र कृष्ण शास्त्री ?

कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले होते की, ‘कुंभलगडमध्ये १०० हिरवे झेंडे आहेत, ते भगव्याने बदलले पाहिजेत. हा भगव्याचा देश आहे, ‘हिरव्या’चा नाही.’ धीरेंद्र शास्त्री त्यांनी आपल्या भाषणात अनेकवेळा हिंदू राष्ट्राची मागणी केली. व्यासपीठावर बागेश्वर धाम सरकार यांच्यासह कथा वाचक देवकीनंदन ठाकूर उपस्थित होते.

भ्याड, सत्तालोभी हुकुमशहापुढे कधी झुकणार नाही; प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
उदयपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्याची स्वत:हून दखल घेतली. धर्माच्या आधारावर समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ अंतर्गत धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नागपुरात खळबळ! मोमीनपुरा येथे खुलेआम गोळ्या झाडल्या; नेम चुकल्याने वाचला जीव
झेंडे काढून भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक

दरम्यान, उदयपूरच्या केलवाडा भागात कुंभलगडमधील धार्मिक स्थळावरील झेंडे काढून त्याऐवजी भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न करताना पाच जणांना अटक करण्यात आली. केलवाडा पोलीस ठाण्याचे (राजसमंद) एसएचओ मुकेश सोनी यांनी सांगितले की, कुंभलगड शहराजवळील एका धार्मिक स्थळावरील झेंडे हटवण्याचा प्रयत्न करताना आरोपींना पकडण्यात आले.

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here