नाशिक : नाशिक जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे भाविकांच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याने सुमारे २१हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील भाविक मंडळी येथील सती माता-सामत दादा देवस्थानच्या दर्शनासाठी एमएच १५ एजी ५७८२ या क्रमांकाच्या ट्रकने आले होते. दर्शन आटोपून सायंकाळच्या सुमारास परतत असताना निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथील वळणावर ट्रक चालक लक्ष्मण राठोड यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक थेट रस्त्यालगतच्या शेतात उलटला. या अपघातात २१हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत जायचं होतं, उत्तर आलं ‘नॉट इंटरेस्टेड’; हर्षवर्धन जाधवांनी क्लीप ऐकवली
या अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. त्यानंतर जखमींना उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. तर यामध्ये चालक आणि एक महिला गंभीर जखमी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नाशिक अपघातातील जखमींची नावे

मांधु चोखा राठोड (वय ४९, रा. कासारी, ता. नांदगाव), गोकुळ मंटु राठोड (वय ३५), मनीष गोकुळ राठोड (वय ‌८९), काप्पल गोकुळ राठोड (वय १०), भाऊलाल सायतान राठोड (वय २०), एकनाथ सलतान राठोड (वय २०, सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव), सुरेश मोहन जाधव (वय २७, नांदगाव), कांताबाई चव्हाण (वय ६०, रा. जातेगाव), महुबाई शंकर चव्हाण (वय ६०, रा. जातेगाव), सुनीता आप्पा राठोड (वय ३५, रा. घोडेगाव), सुवर्णा आप्पा राठोड (वय १६, रा. घोडेगाव), सविता किशोर पवार (वय ४०), विमलबाई सलतान राठोड (वय ३०, रा. घोडेगाव), शितल दत्तू राठोड (वय ४५, रा. घोडेगाव), धोंडीराम राठोड (वय ४०, रा. घोडेगाव), किशोर राजेंद्र पवार (वय २४, रा. चाळीसगाव) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात तर संता राठोड (रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव), वाडीलाल राठोड, राकेश राठोड, राहुल राठोड, अनिता राठोड (सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज अडचणीत; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल, काय कारवाई होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here