म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः असल्याचे खोटे सांगून नोकरी लावतो म्हणून लाखो रूपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या एका युवतीला पोलिसांनी गजाआड केले. या कामात तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या मामाला देखील गारगोटी पोलिसांनी अटक केली आहे. (वय२२, गारगोटी) व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण (वय-३८, रा. निळपण) अशी त्यांची नावे आहेत.

प्रियंका हिने दोन वर्षापूर्वी आपण सीआयडी खात्यात अधिकारी झाल्याचे अनेकांना सांगितले. त्याची खात्री न करता तिचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. याशिवाय भुदरगड तालुक्यात अनेक गावात तिच्या अभिनंदनाचे फलक झळकले. यामुळे तिचे नाव गावागावात पोहोचले. त्याचा फायदा घेत तिने लोकांची लुबाडणूक सुरू केली. अनेक बेरोजगार युवक युवतींना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवत तिने लाखो रूपये उकळण्यास सुरूवात केली.

भुदरगड तालुक्यातील निळपण येथील प्रतीक्षा दळवी हिच्याकडून देखील प्रियांका आणि तिच्या मामाने नोकरी लावतो म्ह्णून पाच लाख पंचवीस हजार रूपये घेतले. दहावी, बारावी मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला घेतला. त्यानंतर तिला बनावट नियुक्तपत्र दिले. याबाबत कोणालाही सांगू नको, नाही तर नोकरीवरून काढून टाकतील अशी धमकी दिली. प्रतीक्षा हिच्या भावाने बहिणीला नोकरी लागल्याच्या आनंदात ही बातमी मोबाईलच्या स्टेट्सला ठेवली. त्यामुळे ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. सीआयडी खात्यात कोणतीही भरती नसताना प्रतीक्षा अधिकारी कशी झाली याचा तपास पोलिसांनी केला. तेव्हा प्रियांका आणि तिच्या मामाने यानुसार अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले.

याबाबत प्रतीक्षा दळवी हिने गारगोटी पोलिसात तक्रार केली असून लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रियांका आणि तिच्या मामाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी यानुसार अनेकांची फसवणूक करत लाखो रूपये कमावल्याची चर्चा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here