मुंबई : गोपनीय दस्तावेज आरोपींपर्यंत पोहोचविल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिघांना अटक केली आहे. पुण्यातील सेवा विकास सहकारी बँकेशी निगडित हे प्रकरण आहे. अटक करण्यात आलेले हे तिघे ईडीच्या कार्यालयातच ऑफिसबॉय म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे.‘ईडी’कडून या बँकेतील घोटाळ्याबाबत माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे. या तपासाशी निगडित गोपनीय दस्तावेज ईडीच्या मुंबई कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुलचंदानी यांचे मित्र असलेल्या बबलू सोनकर यांना पुरवले. याबद्दल दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांसह सोनकर यांना ‘ईडी’ने शुक्रवार, २४ मार्चला अटक केली.

बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज अडचणीत; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल, काय कारवाई होणार?
ईडीने अटक केलेल्या या दोघांची नावे योगेश वागुले व विशाल कुडेकर, अशी असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांनी अवघ्या १३ हजार रुपयांच्या लाचेसाठी हे दस्तावेज संबंधितांना पोहोचविले, असे ‘ईडी’ च्या तपासात समोर आले आहे.

भ्याड, सत्तालोभी हुकुमशहापुढे कधी झुकणार नाही; प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
सेवा विकास सहकारी बँकेतील ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. अमर मुलचंदानी हे अध्यक्ष असताना या बँकेने दिलेली ९२ टक्के कर्जे बुडित खात्यात गेली. त्याबद्दल ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. त्याचेच गोपनीय दस्तावेज पुरविल्याप्रकरणी ‘ईडी’ने तिघांना अटक केली.

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का
हे दस्तावेज सोनकर यांच्या ताब्यात आढळले आहेत. या तिघांनाही विशेष पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here