रत्नागिरी: कोकणात संगमेश्वर तालुक्यात जमिनीचे गैरव्यवहार झाले असून ATL म्हणजे अदानी ट्रान्समिशन लिमिटेडसाठी हे जमिनीचे व्यवहार झाले आहेत, असा खळबळजळक आरोप खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अदानी कंपनीला वनजमीन देण्यासाठी दलालांमार्फत कोकणात ५,००० एकर जमिनी बळकावल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंडी परिसरात झालेल्या या सगळ्या जमीन व्यवहारांची चौकशी करून ते रद्द करावेत, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. चंद्रपूर येथील कंपनी म्हणजेच अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीला २८४ एकर जागा वनखात्याने दिली आहे. त्या बदल्यात आता कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील जागा वनखात्याला देण्यासाठी दलांकडून जमीन खरेदी करण्यात आली आणि त्यावेळी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी महाराष्ट्रातील एका जबाबदार मंत्र्याचे फोन जात होते, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

महिला रेल्वे कर्मचाऱ्याची धडाकेबाज कारवाई, विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल १ कोटींचा दंड वसूल
कोकणात संगमेश्वर तालुक्यात जमिनीचे गैरव्यवहार झाले असून अदानी ट्रान्समिशन लिमिटेडसाठी हे जमिनीचे व्यवहार जमीन दलालांच्या टोळीकडून झाले आहेत, असा खळबळजळक आरोप खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंडी परिसरात झालेल्या या सगळ्या जमीन व्यवहारांची चौकशी करून ते रद्द करावेत अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत ही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावचे उपसरपंच दिनेश कांबळे आणि माजी सरपंच संतोष आणेराव उपस्थित होते. कांबळे यांना शासनाने ताबडतोब संरक्षण द्यावे अन्यथा त्यांचा पत्रकार शशिकांत वारीशे होऊ शकतो अशी भीती खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ईजा-बीजा-तीजा, तिसऱ्यांदा आपटायचं असेल तर निवडणुकीत उभे राहा; विनायक राऊतांचं निलेश राणेंना आव्हान

कोकणातील गोरगरिबांच्या जमिनी हडप करण्याचा रॅकेट अख्ख्या देशातून ज्या दलालांनी सुरू केल आहे. या रॅकेटची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि कोकणात आलेली ही भूमाफिया यांची टोळधाड ताबडतोब रोखावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. पश्चिम घाटाच्या आजूबाजूला असलेली ही संघर्ष तालुक्यातील गाव कुचांबे ते ओझरे या परिसरातील वीस गावांमधील झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार हे ताबडतोब रद्द करून चंद्रपूरला वनविभागाची २८४ हेक्टर जागा इन ऍडव्हान्स एटीएल म्हणजेच अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीला शासनाकडून दिली गेल्याचा खळबळजनक आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

घोटाळेबाज अधिकारी, २९ बँक खात्यात कोट्यवधींचा पैसा, गर्लफ्रेंड-कॉलगर्ल्सला वाटले पैसे…
ही जमीन ताबडतोब ताब्यात घेण्यात यावी आणि ज्या दलालांनी कोकण हे अदानींनकरता शासनाच्या आशीर्वादाने विक्रीस काढला आहे हे प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावेत अन्यथा कोकणवासियांना आपली भूमी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here