कोल्हापूर: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर आणि खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोध होत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राहुल गांधी यांची केवळ खासदारकी काढून घेऊन थांबू नका, जसा अजमल कसाब वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, तसा राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पाकिस्तान मध्ये हाकलून द्या, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. मोदी नावाचे सगळे चोर आहेत असे बोलायला आणि ओबीसी समाजाची बदनामी देशाची बदनामी करायला भाजपने सांगितले नव्हते. तसेच न्यायलायात गेलेला माणूस ही भाजपचा नव्हता. बदनामी राहुल गांधी यांनी करायची आणि आता कायद्याने काम केलं की भाजपच्या नावाने बोंबलायचं हा कुठला नियम? यापेक्षा राहुल गांधींना भाषण येत नसेल तर थोबाड बंद करायला सांगा, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात वाढत असलेल्या लव्ह जिहाद विरोधात विधिमंडळात आवाज उठवला जात आहे. विविध जिल्ह्यात हिंदुत्ववाद्यांचे मोर्चे निघत आहेत. लव्ह जिहादपासून मुलींना वाचवण्यासाठी आणि ते कशाप्रकारे मुलींना अडकवतात याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. लव्ह जिहाद विरोधात कायदा आला तर तो कसा वापरायचा हेही लोकांना कळायला हवं, यासाठी मी व्याख्यानमाला घेत असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

गांधी भक्तांनो मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नका; सावरकरांना हिणवल्याने ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांना झापलं

तसेच काही जिहाद्यांकडून हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होते याचे प्रयत्न होत असतात. याबाबत मी भाषणात केलेले वक्तव्य हे सत्याच्या आधारावर केले आहे. राज्यात जे काही मुस्लिम समाजाचे लँड पाडले गेले, हे जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप इमित्याज जलील यांनी केला होता, मात्र, इम्तियाज जलील याला स्क्रिप्टेड किंवा राजकीय रंग देऊन राज्यात लँड जिहाद जे सुरू आहेत त्याला झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राणे यांनी केला.

राहुल गांधींची खासदारकी रद्द; दिल्लीत मुख्यालयाबाहेर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

चोराला चोर म्हणणं आपल्या देशात गुन्हा ठरला; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं

राज्यात जिथे जिथे हिंदू समाज राहतो तिथे तिथे जागा घ्यायच्या आणि तिथं डुक्कर कापायला सुरू करायचं जेणेकरून हिंदू समाज तेथून निघून जाईल आणि नंतर यांची लोकसंख्या तिथे वाढवायच असा षडयंत्र याचा सुरू आहे. मात्र स्क्रिप्ट कुठलंही असलं तरी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद थांबलं पाहिजे हाच आमचा उद्देश आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.संभाजीनगरचे नामांतर झाल्यानंतर अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. हे सर्व काम काही जिहादींकडून केले जाते. नुपूर शर्मा प्रकरणावेळी ही बाब समोर आली आहे. काही जिहाद्यांकडून हे मुद्दाम करण्यात येत आहे. केवळ हिंदू समाजाला कसे टार्गेट करायचा याचा प्रयत्न केला जात असून यासाठी काही पोलिस अधिकारी देखील त्यांच्यासोबत सामील आहेत. मात्र, आमची त्यांच्यावर नजर असल्याचेही आमदार नितेश राणेनी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here