शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीची घोषणा करण्यात आल्यामुळे आता DA ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो यापूर्वी ३८% होता. सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याबाबत आढावा घेते आणि महागाईच्या आधारावर DA सुधारित केला जातो.
लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल लाभ
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. महागाई भत्त्यासोबतच केंद्रीय पेन्शनधारकांना DR म्हणजेच महागाई सवलतीचा लाभ मिळेल. या दरवाढीनंतर पेन्शनधारकांना ३८% ऐवजी ४२% महागाई सवलत मिळेल. केंद्र सरकारने १ जानेवारी २०२३ पासून त्याची अंमलबजावणी केली. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी मार्च महिन्याच्या पगार वाढीसह मिळेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी दोनदा सुधारणा केली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळ दर सहा महिन्यांनी डीएमध्ये सुधारणा करण्याचा विचार करते. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात वाढ कामगार ब्युरोने जारी केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI-IW) आधारावर मोजली जाते.
प्रशासनाचा खर्च कमी करा; जुन्या पेन्शनच्या मागणीवर हेरंब कुलकर्णींची प्रतिक्रिया
कर्मचाऱ्यांना किती पगारवाढ मिळणार?
DA वाढीसह आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातही घसघशीत वाढ होईल. उदाहरणाने समजून घेऊया – जर तुमचा मूळ पगार २५,००० असेल तर ३८% DA नुसार आता तुम्हाला ९५०० रुपये मिळायचे तर आता डीए ४२% झाल्यानंतर महागाई भत्ता १०,५०० रुपये होतील. म्हणजे दर महिन्याला तुमचा पगार १,००० रुपयांनी वाढेल. तुमच्या वार्षिक पगारात १२,००० रुपयांची वाढ होईल.
यामागचे गणित समजून घ्या…
डीए वाढल्यानंतर मासिक महागाई भत्ता: १८,००० x ४२/१०० = ७,५६० रुपये
DA वाढल्यानंतर आता वार्षिक महागाई भत्ता: ७,५६०x १२ = ९०,७२० रुपये