परभणी : मित्रांसोबत गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी २३ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घडली. नदीपात्रात धानोरा काळे ते बानेगाव दरम्यान असलेल्या पाण्यात पोहत असताना त्याच्या पायाला काहीतरी चावल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पाण्यात साप चावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.धानोरा काळे येथील ४ शालेय विद्यार्थी गुरुवारी गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात पोहत असताना तुकाराम पांडुरंग काळे (वय: १२ वर्ष) या विद्यार्थ्याच्या पायाला काहीतरी चावल्याने सर्वजण पाण्याबाहेर आले. तुकाराम काळे हा नदी पात्रात वाळूवर पडला होता. यावेळी त्याच्या तोंडातून पांढरा फेस आला. हे पाहुण सगळे भयभित झाले. हे पाहून इतर मित्र घराकडे पळाले आणि त्यांनी सदर प्रकार भितीपोटी कोणालाही सांगितला नाही. दुपारी चारच्या सुमारास शेतातून घरी जात असलेल्या काहींना विद्यार्थी मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले.

Crime Diary : पत्नीच्या डोळ्यासमोर होतं सगळं पण फसली; पतीचा मित्र, रक्ताने माखलेले कपडे अन् धाड…धाड…धाड
याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्राकडे धाव घेऊन तुकाराम काळे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती ताडकळस पोलिसांना मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि कपिल शेळके, पोउपनि तरटे, बिट जमादार गणेश लोंढे, रामकिशन काळे, चव्हाण, होमगार्ड दत्ता धनवटे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

वानराच्या निधनाने गावाला अश्रू अनावर; श्रद्धांजलीसाठी गावात ११ दिवसाचा दुखावटा जाहीर!

तर मयत तुकाराम काळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश गिनगिने, डॉ. शुभम चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिरा मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू होती.

Crime Diary: शेतात बाजरी चांगली उगवली पण अचानक आले पोलीस अन्…, पत्नीच्या मृतदेहासोबत पतीचा रक्तरंजित खेळ

…अन्यथा वाचले असते प्राण

गोदावरी नदीपात्रामध्ये होत असताना तुकाराम काळे या बारा वर्षे विद्यार्थ्यांच्या पायाला काहीतरी चावल्यामुळे तो बाजूला असलेल्या रेतीवर जाऊन पडला याच त्याच्या तोंडाला फेस आला. मित्राच्या तोंडाला फेस आला असल्याचं पाहून सोबत असलेल्या ३ मित्रांनी गोदावरी नदी पात्रातून पळ काढला. मात्र, याची माहिती गावात कोणाला दिली नाही. त्यामुळे तुकाराम काळे याचा गोदावरी नदीपात्रात वाळूवर तडफडून मृत्यू झाला. मित्रांनी त्याची माहिती गावातील व्यक्तींना दिली असती तर तुकाराम काळे याचे प्राण वाचले असते.

Crime Diary: रोज थोडं-थोडं करून पतीला जीव घेतला, पुरावाही नाही ठेवला; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here