दरम्यान, संशयास्पद आढळून आलेल्या मृत इसमाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने या प्रकरणात पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानुसार मृतदेहाची ओळख पटवून तपासाची चक्र फिरवत मयताच्या पत्नीचे कॉल डिटेल्स व तांत्रिक माहितीच्या आधारे मयताच्या पत्नीस ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली त्यावेळी या खुनाचा उलगडा झाला. दत्तात्रेय राजाराम ठाकरे वय( ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो बागलाण तालुक्यातील लाडूद येथील रहिवासी आहे.
दरम्यान, मयत दत्तात्रेय राजाराम ठाकरे याची पत्नी माधुरी ठाकरे (वय २५) हिचे नंदुरबार जिल्ह्यातील आसने येथील भरत इलाचंद पाटील वय (३१) याच्याशी प्रेम संबंध होते. मात्र मयत ठाकरे हा या प्रकरणात अडसर ठरत असल्याने आरोपीने काल रात्री दत्तात्रेय ठाकरे यास दारू पाजली त्यानंतर दत्तात्रय ठाकरे याचा गळा दाबून त्याचा खून केला त्याचा साथीदार राकेश पावबा सावळे (वय१८) रा.आसने ता.जि. नंदुरबार याच्या मदतीने लाडूदकडून दुचाकीवर मध्यभागी बसवुन जायखेडा येथील अमरधाम लगत असलेल्या मोसम नदीकाठी नेऊन टाकले त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या डोक्यात दगड टाकला.
संबंधित गुन्ह्यात मयत इसमाची पत्नी आणि तिचे दोन साथीदार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. मृताची पत्नी, तिचा प्रियकर व त्याचा साथीदार यांनी प्रेमसंबंधातून कटकारस्थान रचून खून केल्याचे उघडकीस आले याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी