एलआयसीची नवीन योजना
LIC आता कंपन्यांमधील कर्ज आणि इक्विटी एक्सपोजर मर्यादित करण्याचा विचार करत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार एलआयसी इक्विटीमधील गुंतवणूक आणि एक्सपोजरवर मर्यादा निश्चित करेल, जेणेकरून जोखीम कमी करता येईल. सध्या, एलआयसी थकबाकीच्या १०% पेक्षा जास्त आणि थकित कर्जाच्या १०% पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. मात्र, एलआयसीच्या नवीन योजनेला बोर्डाची मंजुरी मिळणे बाकी आहे. दरम्यान, लक्षात घ्या की LIC शेअर मार्केटमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते आणि याअंतर्गत एलआयसीने अदानींच्या कंपन्यांमध्येही पैसा ओतला होता.
मोदींच्या भाषणावर राहुल गांधी म्हणाले, मोदी अदानींना संरक्षण द्यायचा प्रयत्न करतायंत
अदानी प्रकरणात टीकास्त्र
देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने अदानी समूहाच्या ७ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. LIC कडे अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीचे एक्सपोजर आहे. या गुंतवणुकीचे मूल्य ३०,१२७ कोटी रुपये आहे. तर कर्ज आणि इक्विटी या दोन्हींचा समावेश करून LIC चे अदानी कंपनीचे एकूण एक्सपोजर ३६,४७४.७८ कोटी रुपये असून हे एक्सपोजर कंपनीच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ ०.९७५% आहे.
अदानी प्रकरणामुळे झाला गदारोळ
एलआयसीने अदानी समूहाच्या ७ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून ही गुंतवणूक हजारो कोटींची आहे. अशा स्थितीत जेव्हा अदानी ग्रुपवर हिंडेनबर्गचा अहवाल समोर आला तेव्हा एलआयसीच्या शेअर्सनाही मोठा फटका बसला होता आणि शेअर्स सर्वकालीन नीचांकी पातळीवर कोसळले होते. एलआयसीच्या शेअरची किंमत गेल्या शुक्रवारी ५६२ रुपयांपर्यंत घसरली होती.