मुंबईः विरारमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी तिच्या प्रियकरासोबत विरार येथील जीवदानी मंदिराच्या मागे असलेल्या एका टेकडीवर फिरायला आली होती. त्याचवेळी तिथे असलेल्या दोघा आरोपींना त्यांना त्यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत न्यूड डान्स करण्यास भाग पाडले, असा आरोप तरुणीच्या प्रियकराने केला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. धीरज सोनी आणि यश शिंदे असं या दोन्ही आरोपींचे नाव असून गुरुवारी सकाळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन्ही आरोपी घटनेच्या दिवशी जिवदानी मंदिराच्या मागे असलेल्या टेकडीवर दारु पिण्यासाठी गेले होते. बुधवारी दुपारी ३च्या सुमारास २० वर्षांची तरुणी आणि तिचा २२ वर्षीय प्रियकरदेखील तिथे पोहोचले. त्याचवेळी तरुणी आणि तिच्या प्रियकराच्या खासगी क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ शूट केले. व हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट खेचून पसार झाले.

सोनी आणि शिंदे तिथून पसार झाल्यानंतर त्यांनी ते लॉकेट विकण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही त्यांच्याकडून ते विकत घेतलं नाही. शेवटी ते परत घटनास्थळी आले. तेव्हा पिडीत तरुणी आणि तिचा प्रियकर तिथेच होती. आरोपींनी धमकावल्यानंतर आणि चोरी झाल्यानंतरही दोघे त्याच ठिकाणी का थांबले होते, याची अद्याप माहिती समोर आली नाहीये, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पुन्हा घटनास्थळी परतल्यानंतर आरोपींनी दोघांकडून २, ००० ते ५, ००० रुपये मागितले. तसंच, दोघांचे फोनही खेचून घेतले. तसंच, त्यांनी त्यांच्याकडून अजून ५०० रुपयांची मागणी केली. जेव्हा दोघांनीही पैसे नसल्याचे सांगितले तेव्हा फोनमधून ५०० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पैसे घेतल्यानंतर जोडप्याने आरोपींकडे फोटो व व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली. मात्र, आरोपींना त्यांना अंगावरील कपडे उतरवून डान्स करण्यास भाग पाडले, असं तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

प्रियकरासोबत ‘त्या’ ठिकाणी फिरायला जाण्याची चूक झाली; तरुणीवर दोघांनी केले भयानक अत्याचार
आरोपींना दोघांना अश्लील हावभाव करत डान्स करण्यास सांगितल्यानंतर तरुणांला राग अनावर झाला. त्याने तिथेच असलेली दारुची बाटली दोन आरोपीपैकी एकाचा डोक्यात मारली. त्यानंतर त्याला खोलवर जखम झाली तसेच डोक्यातून रक्तही येऊ लागले. डोक्यात वार झालेल्या संतापलेल्या सोनी आणि शिंदेने तरुणाला तिथेच झाडाला कंबरेच्या पट्ट्याने बांधून ठेवले. व तरुणीला तिथून खेचून घेऊन गेले व तिच्यावर बलात्कार केला, यानंतर तरुणाचे कपटे पेटवले व तरुणीची पर्स घेऊन तिथून पळ काढला.
विदर्भातील या जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; आजपासून दोन दिवस महत्त्वाचे
हा घृणास्पद प्रकार घडल्यानंतर तरुणी तिथून घरी परतली. मात्र, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाच सांगितला नाही. नग्नावस्थेत असलेल्या एका युवकाला बांधून ठेवले असल्याचा पोलिसांना फोन आला. तेव्हा पोलिस तिथे पोहोचले आणि २२ वर्षांच्या तरुणाने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितले. सुरुवातीला तरुणीने तिच्यावर अत्याचार झाल्याच नाही अशी बतावणी केली. मात्र, नंतर ती पोलिस तक्रार देण्यास तयार झाली, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी आम्हाला साथ दिली पण त्यांचा आवाज दाबला जातोय; बार्शीतील निर्भयाच्या आईचा टाहो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here