lalbaug murder case: आईच्या मृतदेहाचे तुकडे केले, पण तिची हत्या केली नाही, असा जबाब रिंपलनं पोलिसांना दिला आहे. रिंपल वारंवार पोलिसांना एकच गोष्ट सांगत आहे. त्यापलीकडे ती काहीही सांगत नाही. त्यामुळे पोलिसांनी चार शक्यतांवर तपास सुरू केला आहे.

 

lalbaug murder
मुंबई: आईच्या मृतदेहाचे तुकडे केले, पण मी तिची हत्या केली नाही, असं रिंपल जैननं पोलिसांना सांगितलं. वीणा जैन (५३) यांच्या मृतदेहाचे तुकडे काळाचौकी पोलिसांना त्यांचं वास्तव्य असलेल्या लालबागमधील इब्राहिम कासिमी चाळीत आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी वीणा यांची मुलगी रिंपलला अटक केली. रिंपलच्या चौकशीतून अद्याप पोलिसांना फारशी माहिती हाती लागलेली नाही. आईच्या मृत्यूसाठी नातेवाईक मलाच जबाबदार धरतील अशी भीती मला वाटत होती. म्हणून मी आईच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण मी तिची हत्या केलेली नाही, असं रिंपल पोलिसांना वारंवार सांगत आहे. आईच्या मृत्यूबद्दल समजताच नातेवाईकांनी मला घराबाहेर काढलं असतं. आम्हाला मिळणारी आर्थिक मदत बंद केली असती, या भीतीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचं रिंपलनं पोलिसांना सांगितलं.
तू माझा सांगाती! पत्नीला कायम सोबत घेऊन जातो फूड डिलिव्हरीसाठी; कहाणी वाचून डोळे पाणावतील
रिंपलला पोलिसांनी १५ मार्चला अटक केली. तेव्हापासून तिची चौकशी सुरू आहे. ‘आईच्या मृत्यूबद्दल कोणालाच समजू नये यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडे केले असं रिंपल सातत्यानं सांगत आहे. मात्र आईच्या हत्येची कबुली तिनं दिलेली नाही. चायनिजच्या स्टॉलवर काम करणाऱ्या दोन तरुणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. वीणा पहिल्या मजल्यावरून पडल्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या. दोन तरुणांनी त्यावेळी वीणा यांना उचलण्यास मदत केली. वीणा यांना झालेल्या जखमा पाहता त्यांना तातडीनं रुग्णालयात ने, असं दोघांनी रिंपलला सांगितलं होतं. मात्र रिंपलनं त्या दोघांकडे दुर्लक्ष केलं. आईला घरापर्यंत नेण्यासाठी रिंपलनं दोघांची मदत मागितली,’ असं पोलीस दलातील सुत्रांनी सांगितलं.
बेदम मारलं, तलावात फेकलं, तरीही तरुण बुडेना; मग अंगावर विटा टाकल्या; ‘तो’ वाद जीवावर बेतला
‘गंभीर जखमांमुळे वीणा यांचा मृत्यू झाला असावा, अशी एक शक्यता आहे. रिंपलनं जखमी आईला मरू दिलं असावं. आईचा मृत्यू व्हावा असं तिला वाटत असावं, अशी दुसरी शक्यता आहे किंवा तिनं आईला गळा दाबून मारलं असावं अशीही एक शक्यता वाटते. आम्ही विविध मार्गांचा, पद्धतींचा वापर करूनही रिंपल तोंड उघडत नाहीए. फॉरेन्सिकच्या अहवालातून काहीतरी माहिती मिळू शकते. पण मृतदेहाची अवस्था पाहता अहवालामधून कितपत माहिती मिळू शकेल, याबद्दल ठोस काही सांगता येणार नाही,’ असं पोलीस सुत्रांनी सांगितलं. रिंपलनंच आईला पहिल्या मजल्यावरून ढकललं असावं, अशीही शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

वीणा यांचा मृत्यू २५ ते २७ डिसेंबर दरम्यान झाला असावा, असं पोलीस तपास सांगतो. रिंपलनंदेखील याला दुजोरा दिला आहे. या तीन दिवसांनात नेमकं काय घडलं याचा तपास पोलीस करत आहेत. पहिल्या मजल्यावरून पडल्यानंतर वीणा चाळीतील रहिवाशांना, आसपास राहणाऱ्या नातेवाईकांना कधीच दिसल्या नाहीत. आईला अर्धांगवायूचा झटका आला आणि ती उपचारांसाठी कानपूरला गेल्याची बतावणी रिंपलनं केली. क्राईम पेट्रोल पाहून तिला आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना सुचली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here