धाराशिवः तुळाजापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १२ वर्षांच्या मुलीसोबत गावातील युवकानेच घृणास्पद प्रकार केला आहे. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातील ३५ वर्षांच्या नराधमाने तिच्याच घरात येऊन बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.आरोपीने १२ वर्षांच्या मुलीला जबरदस्ती घरातील खोलीत घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला. तसंच, अत्याचाराचा व्हिडिओ बनवून पिडीत मुलीला धमकावल्याचेही समोर आलं आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे नराधमाच्याविरोधात अखेर पोक्सोअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील इयत्ता सहावीमध्ये शिकणारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक २३ मार्च रोजी आपल्या बहिणींबरोबर घरी वेळ घालवत होती. त्याचवेळी ३५ वर्षीय नराधम त्यांच्या घरात घुसला व पिडीतेला आतील खोलीत घेऊन गेला व तिच्यावर आत्याचार केला. आई घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलींनी आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला.

पिडीत बारा वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून ३५ वर्षे गावातील नराधमाच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १११/२३ भारतीय दंड विधान कलम ३७६ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद हे करत आहेत. बारा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून नराधम हा फरार झाला असून पोलीस नराधमाचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी