चंद्रपूरः जिल्ह्यातील वनविभाग वनपरिक्षेत्रात धाबा अंतर्गत येणाऱ्या सुकवाशी डोंगरगाव जंगलात वाघिण आणि बछड्याचे कुजलेल्या अवस्थेत शव आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वन विभागात खळबळ उडाली आहे. वाघिणीच्या इतर बछड्यांचा शोध वनविभाग घेत आहे. ही घटना सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६३ व १६१मध्ये घडली आहे. शुक्रवारी एका बछड्याच्या मृतदेह कक्ष क्रमांक १६१मध्ये आढळून आला होता. त्यानंतर वन विभागाने आज शोध मोहिम हाती घेतली असता कक्ष क्रमांक १६३मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाघांना अग्नी दिला आहे. वाघ आणि बछड्याचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या वाघिणीचे अन्य काही बछडे होते काय? याचा शोध वनविभाग घेत आहे.
राहुल गांधींना मोठा सेटबॅक; आता थेट वयाच्या ६३ व्या वर्षी निवडणूक लढता येणार?
शिकार की नैसर्गिक मृत्यू?

गोजोली सुकवाची वनपरिक्षेत्रात प्रवाह सोडलेल्या ताराने वन्य जीवांची शिकार केली जाते. या परिसरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वाघांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघिण आणि बछडाचा मृत्यू नैसर्गिक आहे की शिकार करण्यात आली आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नाशिकः नदीकाठावर अज्ञात मृतदेह, खिशातील औषधाच्या चिठ्ठीवरुन ओळख पटली, आठ तासांत गूढ उकलले
वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

धाबा गोंडपिपरी मार्गावर सुखवाशीचे जंगल आहे. या मार्गावर अधून मधून वाघ, अस्वल, बिबट यांचे दर्शन प्रवाशांना झालेले आहे. या वनपरिक्षेत्रात मौल्यवान नैसर्गिक सागवानाचा मोठा साठा आहे. सागवान चोरीच्या अनेक घटना इथं उघडकीस आलेले आहेत. असे असताना या वनपरिक्षेत्राकडे वनविभागाचे कायमच दुर्लक्ष झाले आहे.

गावातीला तरुण घरात घुसला, १२ वर्षांच्या मुलीला फरफटत खोलीत घेऊन गेला अन् घडला एकच थरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here