सातारा : साताऱ्यातील चचेगाव (ता. कराड) गावाच्या हद्दीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत दोघा भावांचा पाठलाग करत त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. ही घटना १२ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात काल शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान फिर्याद दाखल झाली आहे. तालुका पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत श्रीधर राजेंद्र घारे (रा. घारेवाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे. यात अशोक वगरे, रोहन वगरे, विकास घारे, ओमकार वगरे, कुमार वगरे, महेश माने, शिवाजी माने, आबा घारे (सर्वजण रा. घारेवाडी, ता. कराड) यांच्यासह अनोळखी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुम्ही इतके महाविकासपुरुष होतात, तर लोकसभा निवडणुकीला का पडलात; शिवेंद्रसिंहराजेंची उदयनराजेंवर बोचरी टीका
पोलिसांनी सांगितले की, घारेवाडी येथील श्रीधर घारे यांच्या कुटुंबीयांचा जमिनीच्या कारणावरून अशोक वगरे यांच्याशी वाद झाला होता. त्यात श्रीधरची आई जखमी झाली होती. तिच्यावर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. १२ मार्च रोजी जखमी आईला पाहण्यासाठी श्रीधर घारे आणि त्याचा भाऊ रितेश घारे हे दोघं भाऊ दुचाकीवरून घारेवाडीहून कराडला येत होते.

ते दोघे चचेगाव गावच्या हद्दीत आले असताना एक इनोवा कार, स्कॉर्पिओ आणि मोटरसायकलवरून आलेले काही जणांनी त्यांना अडवले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, कोयता तसेच तलवार होती. ते मारहाण करण्याच्या उद्देशाने आल्याचे निदर्शनास आल्यामुळे श्रीधर आणि भाऊ रितेश हे दुचाकी तेथेच सोडून जवळच असलेल्या उसाच्या शेतात पळत गेले. ते दोघे पळत गेल्याचे पाहताच संशयित आरोपींनी त्यांच्या गाड्या तेथेच सोडून त्या दोघांचा पाठलाग केला.

उसातून पळून जाऊन एका ओढ्याच्या कडेला गेले. तेव्हा संशयित आरोपींनी तीनदा त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या श्रीधर आणि रितेश यांनी गावाच्या दिशेने पळ काढला. तसेच गावातील एका घरात त्यांनी आसरा घेतला. त्या कुटुंबीयांनी त्या दोघांना धीर देत घरात लपवून ठेवले. त्यांचा पाठलाग करणारे संशयित आरोपी काही वेळाने तेथून निघून गेले.

या घटनेबाबत श्रीधर घारे याने शुक्रवारी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक दूधभाते अधिक तपास करत आहेत.

जोडपं इंटिमेट होत असताना व्हिडिओ शूट, न्यूड डान्स करायला लावला; विरार अत्याचाराची A-Z कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here