उल्हासनगर : उल्हासनगरजवळील माणेरे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोंबड्यांच्या डीलरशिपवरून गावात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सागर पाटील गटातील अजीज शेख आणि महेंद्र म्हात्रे हे जखमी झाले असून आरोपी आकाश भोईर, आशिष उर्फ बंटी भोईर, सुशील भोईर, बादल वर्मा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जुने अंबरनाथ गावात रहाणारे महेंद्र म्हात्रे आणि सागर पाटील हे कोंबड्यांची डीलरशिप करण्याचा व्यावसाय करतात. तसेच माणेरे गावात राहणारा आकाश भोईर हादेखील कोंबड्यांचा डीलरशिप व्यवसाय करतो. दरम्यान, महेंद्र म्हात्रे, सागर पाटील यांनी माणेरे गावात कोंबड्या डीलरशिप केल्याच्या रागातून आकाश भोईर यांच्यात वाद निर्माण झाले. याच कारणावरून आकाश भोईर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माणेरे गाव प्रवेशद्वारा जवळ अजीज शेख आणि महेंद्र म्हात्रे यांना अडवून जीवघेणा हल्ला केला.

गोदावरीत पोहताना अचानक तोंडाला आला फेस, मित्रांनी पाहताच ठोकली धूम; पुढे जे घडलं ते धक्कादायकच…
या हल्ल्यात अजीज शेख याच्या हातावर गंभीर वार झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 326, 323, 504, 506,143,147,148,149 प्रमाणे आरोपी आकाश भोईर, आशिष उर्फ बंटी भोईर, सुशील भोईर, बादल वर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत फिर्यादी महेंद्र म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२४/०३/२०२३ रोजी सकाळी ७.१० वाजेच्या सुमारास मी आणि माझा मित्र सागर पाटील कोंबड्या पोहचविण्याचं काम अंबरनाथ पुर्व भागात करीत होतो. त्यावेळी मला सागर भोईर याचा फोन आला की तू लवकर ये. मग मी आणि मित्र अजिज दस्तगीर शेख मोटार सायकलवर तसेच सागर पाटील व कुंदन मडवी हे एका मोटार सायकलवर असे आम्ही सागर भोईरला भेटण्यासाठी गेलो. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मोणेरेगाव उल्हासनगर नं. ४, काजल किराणा स्टोअर्स समोर रोडवरून जात असताना सागर पाटील व कुंदन मडवी हे माझ्या पुढे निघून गेले. तेव्हाच तिथे हातात तलवारी, लोंखडी रॉड लाकडी दांडके घेवून उभे राहीलेले आरोपी आकाश भोईर, आशिश उर्फ बंटी भोईर, सुशिल भोईर, बादल वर्मा कल्पेश आणि इतर ३ ते ४ जणांनी माझी मोटार सायकल थांबून “तुम्ही इकडे का आले” असं बोलून मला व अजित शेख या शिवीगाळ दमदाटी करून मोटार सायकलवर जोर-जोरात त्यांचेकडील हत्याराने मारू लागले. त्यामुळे आम्ही दोघे खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करत असतांना आरोपी आकाश भोईर व सुशिल भोईर यांनी तलवारीने माझ्या पाठीवर हातावर तसेच अजिज दस्तगीर शेख याचे हातावर वार केले. त्यात माझ्या पाठीवर तसेच अजिज दस्तगीर शेख याच्या उजव्या हातावर, पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली आहे.’

Crime Diary : पत्नीच्या डोळ्यासमोर होतं सगळं पण फसली; पतीचा मित्र, रक्ताने माखलेले कपडे अन् धाड…धाड…धाड

या माहितीनंतर, पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here