मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) शेअर्सने गेल्या तीन वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. तीन वर्षांत या बँकेच्या शेअरने १८०% हून अधिक परतावा दिला आहे. मार्च २०२० मध्ये एसबीआयचा शेअर १८० रुपये प्रति शेअरच्या आसपास ट्रेडिंग करत होता, पण आता या शेअरने ५०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारच्या व्यावहार सत्रात शेअर १.४१ टक्के घसरून ५०५.५० रुपयांवर क्लोज झाला. मात्र, स्टॉक सध्या ६२९.५५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून २३% खाली घसरला आहे. लक्षात घ्या की १५ डिसेंबर २०२२ रोजी स्टॉकने ५२ आठवड्यांतील सर्वोच्च कामगिरी वाढ नोंदवली होती.

Adani Stocks Update: हिंडेनबर्ग अहवालाचे पडसाद, अदानींचे शेअर्स सपाटून आपटले; अशी आहे सद्यस्थिती
SBI शेअरचा परतावा

गेल्या वर्षभरातील परताव्याच्या बाबतीत एसबीआयचा शेअर बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेच्या मागे आहे. बँक ऑफ बडोदाच्या समभागांनी एका वर्षात ५१ टक्के, तर युनियन बँकेच्या समभागांनी या कालावधीत ६५% परतावा दिला आहे. पीएनबी आणि कॅनरा बँकेच्या समभागांनी एका वर्षात अनुक्रमे २९% आणि २२% रिटर्न देत गुंतवणूकदारांचा खिसा भरला आहे.

दिग्गज IT कंपनीचा शेअर ३१०० रुपयांवर, खरेदी-विक्री की होल्ड करावं? मार्केट एक्स्पर्ट म्हणतात…
SBI शेअरवर बाजार तज्ञ काय म्हणतात…
या पीएसयू बँकेच्या स्टॉकबाबत ब्रोकरेज आणि तज्ज्ञांनी आणखी तेजीचा अंदाज वर्तवला आहे. विदेशी ब्रोकरेज जेफरीजने आपल्या ताज्या अहवालात भारतीय बँकांचे मूल्यांकन खूपच आकर्षक दिसते, असे म्हटले असून एसबीआय देखील त्याच्या शीर्ष बँक स्टॉक पिक्सपैकी एक आहे. टर्टल वेल्थचे संस्थापक आणि पोर्टफोलिओ मॅनेजर रोहन मेहता म्हणाले की, एसबीआय हा आमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे आणि आमच्या फंडासाठी टॉप ३ होल्डिंगपैकी एक आहे.

याला म्हणतात नशीब! अदानींच्या शेअर्सचा धूमधडाका, १५ दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
बँकिंग क्षेत्रावर दबाव
जागतिक बँकिंग प्रणाली मुख्यत्वे मालमत्तेच्या गुणवत्तेपेक्षा तरलतेमुळे आव्हानांना तोंड देत आहे, असे मोतीलाल ओसवाल यांनी म्हटले. ब्रोकरेजने सांगितले की भारतीय बँकिंग व्यवस्थेसमोर कोणतेही महत्त्वाचे आव्हान दिसत नाही. एंजल वन लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंग म्हणाले की, या तिमाहीत एसीबीआयने तीव्र सुधारणा नोंदवली आहे. तर एकूणच, जागतिक मंदीबद्दल गुंतवणूकदारांच्या वाढत्या भीतीमुळे आणि जागतिक बँकिंग प्रणालीशी संबंधित नकारात्मक बातम्यांमुळे बँकिंग क्षेत्रावर दबाव आला आहे.

SBI शेअरची नवीन लक्ष्य किंमत
देशांतर्गत ब्रोकरेजने एसबीआय स्टॉकला ‘बाय’ (खरेदी) रेटिंग दिले असून ब्रोकरेज हाऊसने म्हटले की, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे शेअर्स ७२५ रुपयांपर्यंत खरेदी करता येतील. म्हणजे जर एखाद्याने एसबीआयचे शेअर्स सध्याच्या ५०५.६० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर खरेदी केले तर त्याला ४०% हून अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here