गांधीनगर: गुजरातच्या अहमदाबादमधील दहेगाम तहसीलमध्ये शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरून जात असलेल्या इसमानं दुचाकी थेट नर्मदा कालव्यात वळवली. यानंतर चारही जण दुचाकीसह कालव्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी दहेगाम नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचं पथक, डभोडा पोलीस, पाणबुड्यांनी शोधमोहिम राबवत महिलेला वाचवलं. महिलेच्या पतीचा मृतदेह हाती लागला असून दोन मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेतली जात आहे.एक कुटुंब दुचाकीसह कालव्यात पडल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी मिळाली. कुटुंब दहेगामच्या रायपूर गावातून वाहणाऱ्या नर्मदा कालव्यावरून जात होतं. कुटुंब दुचाकीसह कालव्यात पडल्याची माहिती मिळताच दहेगाम नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सूर्यदेव सिंह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी ममता ठाकोरला वाचवलं. कालव्यातून दुचाकीदेखील बाहेर काढण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास किरण ठाकोरचा (३५) मृतदेह बाहेर काढण्यात आला. कालव्यात पडलेली दोन मुलं अद्याप सापडलेली नाहीत.
खेळता खेळता गेला, तरुण डॉक्टरचा चटका लावणारा अंत; कुटुंबानं कबरीवर लावला QR कोड, कारण काय?
कालव्यात पडलेलं कुटुंब दहेगामच्या वासणा चौधरी गावचं रहिवासी आहे. रात्री उशिरापर्यंत मुलांसाठी शोध मोहिम राबवण्यात आली. यासाठी एनडीआरएफचं पथक आणि स्थानिक पाणबुड्यांची मदत घेण्यात आली. मात्र दोन मुलांचा शोध लागलेला नाही. कार्तिक (८) आणि जिग्नेश (५) अशी मुलांची नावं आहेत.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

डभोडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम एस राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गवंडीकाम करायचा. गुरुवारी रात्री पत्नी ममतासोबत त्याचा वाद झाला. शुक्रवारी सकाळी किरण कामाला जायला निघाला. त्यावेळी पत्नीनंदेखील सोबत येण्याचा आग्रह धरला. तिनं दोन मुलांनादेखील सोबत घेतलं. वासणा चौधरी गावातून किरण पत्नी, मुलांना घेऊन निघाला. रायपूर गावच्या जवळ असलेल्या नर्मदा कालव्यात त्यानं दुचाकी टाकली. यावेळी ममता मागे बसलेली होती. ती बुडू लागताच स्थानिकांनी तिला वाचवलं. किरणचा मृतदेह हाती लागला असून दोन मुलांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here