नवी दिल्ली : महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिल्लीतील सिंघू गावात हा शरीराचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. आरोपी परविंदर हा मोलमजुरी करतो. पीडित महिलेसोबत त्याने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु तिने नकार दिल्याच्या रागातून परविंदरने तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

सिंघू गावातील एका वाईन शॉपवर ९ फेब्रुवारीला दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्याने महिलेला पाचशे रुपये दिले आणि शरीर संबंध ठेवण्यास सांगितलं. या ऑफरला महिला तयार झाली. संध्याकाळी सात वाजता दोघं भेटले.

आरोपी परविंदर हा वाल्मिकी मोहल्ला भागात भाड्याने घेतलेल्या घरात राहत होता. त्या ठिकाणी दोघं जण गेले. आधी परविंदरने मद्यपान केले. त्यानंतर ‘आज आपण वेगळ्या पद्धतीने सेक्स करुयात’ असं म्हणत त्याने तिच्याशी अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला महिलेने कडाडून विरोध केला.

पत्नी-मुलांना सासुरवाडीला सोडलं, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, नाशकात हळहळ
महिलेच्या विरोधाने परविंदर चांगलाच खवळला. त्याने आपल्या गळ्यातील गमछा काढला आणि तिचा गळा आवळला. मात्र त्याचं क्रौर्य इथवर थांबलं नाही. महिलेचा मृत्यू झाल्याची खात्री बाळगत तिच्या मृतदेहावर पाशवी अत्याचार केले. तिच्या पार्थिवासोबत त्याने अनैसर्गिक संभोग केल्याचा आरोप आहे.

महिलेचा मृतदेह ब्लँकेटने झाकून परविंदरने घटनास्थळावरुन पळ काढला. आधी त्याने आपला मोबाईल स्विच ऑफ केला. मग त्याने हरियाणातील सोनीपत गाठून एका सायकल सर्कस टीममध्ये प्रवेश मिळवला.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

दरम्यानच्या काळात परविंदर आपल्या मूळ गावी गेला. तिथे त्याने आपल्या मित्रांकडे पैसे मागितले. मात्र कोणीही त्याला उभं केलं नाही. अखेर तो दिल्लीतील सिंघू गावात परतला. तिथे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

अहिरांच्या पुतण्याचा मित्रासह संशयास्पद मृत्यू, मृतदेहांशेजारी ग्लास-बाटली; गूढ अधिक गडद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here