गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील प्रभादेवी परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. यावेळी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलमधून गोळी झाडल्याचा आरोप केला जात होता. मात्र काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी या प्रकरणात सदा सरवणकर यांना क्लीन चिट दिली
दरम्यान, सदा सरवणकर यांनी परवाना असलेली बंदूक त्यांनी इतर व्यक्तीला वापरण्यास दिली आणि त्याच्या हातून प्रभादेवीत गोळीबार झाला, त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच त्यांचा शस्त्रास्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतल्याचं फडणवीसांनी सांगितलं. म्हणजेच सदा सरवणकर यांना क्लीन चिट मिळाली असली, तरी त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मध्यंतरीच्या काळात पिस्तुलाची कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये सदा सरवणकर यांच्या पिस्तुलमधून गोळी झाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणांचा गैरवापर, अमृता फडणवीसांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणावर शरद कोळींचा हल्लाबोल
ठाकरे आणि शिंदे गटातील राड्यावेळी झाडण्यात आलेली गोळी सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातूच बाहेर पडली होती. परंतु त्यावेळी पिस्तुल सदा सरवणकर यांच्या हातात नव्हते, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यामुळे आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चिट देण्यात आली होती.