पॅन-आधार लिंक न केल्यास मोठे नुकसान होईल
विशेष म्हणजे करदात्यांसाठी पॅन कार्ड सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अशा स्थितीत तुम्ही ३१ मार्च २०२३ पूर्वी पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक न केल्यास तुमचे पॅन वार्ड निष्क्रिय होईल आणि तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. सर्वात मोठा तोटा म्हणजे नवीन वर्षांपासून तुम्ही तुमचे आयकर रिटर्न (आयटीआर) भरू शकणार नाहीत.
याशिवाय तुम्ही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. त्यामुळे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुमहाला तुम्ही लगेच ते लिंक करा. तुम्हाला दोन्ही दस्तऐवज लिंक केले आहेत की नाही हे तपासायचे असल्यास तुम्ही ऑनलाईन सोप्या स्टेप्सचे अनुसरण करून लिंकिंग स्थिती तपासू शकता. तसेच पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत जवळ आल्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन लिंकिंग करण्यास अडचण होत असेल तर तुम्ही अन्य काही चरणांद्वारेही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
पॅन-आधार लिंकिंगची ऑनलाईन प्रक्रिया
- पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी, तुम्ही प्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइट www.incometax.gov.in वर जा.
- पुढे लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
- एक पॉप अप विंडो उघडेल, जी तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल. नसल्यास, मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘आधार लिंक करा’ वर क्लिक करा.
- पॅन तपशीलांनुसार नाव जन्मतारीख आणि लिंग यासारखे तपशील आधीच नमूद केले जातील.
- तुमच्या आधार कार्डावर नमूद केलेल्या पॅन तपशीलांसह स्क्रीनवर पडताळणी करा. कृपया. लक्षात घ्या की जर काही जुळत नसेल, तर तुम्हाला कागदपत्रांमध्ये ते दुरुस्त करावे लागेल.
- तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि “आता लिंक करा” बटणावर क्लिक करा.
- एक पॉप-अप संदेश तुम्हाला कळवेल की तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.
- तुमचा पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ ला देखील भेट देऊ शकता.
पॅन- आधारशी लिंक न झाल्यास काय करायचं?
तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला जवळच्या पॅन सेंटरला भेट देऊन स्वाक्षरी केलेला आधार सीडिंग फॉर्म सबमिट करावा लागेल. लक्षात ठेवा की आधार सीडिंग फॉर्मसोबत तुम्ही पॅन आणि आधार सारखी सर्व संबंधित कागदपत्रे जवळ ठेवा.
SMS द्वारे पॅन क्रमांक आधारशी कसा लिंक करायचा?
ऑनलाईन तुम्हाला पॅन कार्डशी आधार क्रमांक लिंक करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही मोबाईलवरून एक SMS पाठवून लिंक करू शकता. एसएमएसद्वारे तुमचा आधार पॅनशी लिंक करण्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.
- पहिले UIDPAN फॉरमॅटमध्ये एक संदेश टाइप करा म्हणजे, UIDPAN (स्पेस) १२-अंकी आधार क्रमांक (स्पेस) १०-अंकी पॅन क्रमांक.
- तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून फक्त ५६७६७८ किंवा ५६१६१ वर एसएमएस पाठवा.
- तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासंदर्भात एक पुष्टीकरण संदेश मिळेल.
दरम्यान, लक्षात घ्या की तुमच्या आधार आणि पॅन कार्डावर नमूद केलेली नावे तंतोतंत जुळली पाहिजेत. काही विसंगती असल्यास पॅनशी आधार लिंक होणार नाही. UIDAI ने आधार धारकांना त्यांच्या अधिकृत वेब पोर्टलमध्ये किंवा NSDL PAN मध्ये त्रुटी आढळल्यास बदल करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.