सातारा : श्रमिक मुक्ती दलातर्फे कोयनानगर येथे दि. २७ फेब्रुवारीपासून प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात तरुण तरुणींसह वयोवृद्ध धरणग्रस्त सहभागी झाले आहेत. अशाच एक वयोवृद्ध धरणग्रस्त ७५ वर्षीय आजीबाई सौ. अनुसया कुशाबा कदम या न्याय हक्काच्या या लढ्यात धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. धरणग्रस्तांचा उत्साह वाढवणाऱ्या आजीबाई या राहतात तरी कुठे म्हणून कुतूहलापोटी त्यांचं घर गाठलं तर भयानक वास्तव समोर आलं. अनुसया आजी या मूळच्या कोयना धरणग्रस्त. पाटण तालुक्यातील आंबेघर गावचे कदम कुटुंब. त्या गेली ६४ वर्ष आपल्या वडिलांच्या जागेत कुडामाडाचं घर करून गोषटवाडी येथे स्थायिक आहेत. आजीच्या कुटुंबात सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले ८० वर्षीय पती, मुलगा, सून, नातवंडे असा आजींचा परिवार. आजींनी अनेक अनेक वर्ष धरणग्रस्त व भूकंपाचे धक्के खात संसार मांडला. साधी भोळी आजी पण तिसरी चौथी पिढी सुरू झाली, तरी आजी मोडक्या तोडक्या फळ्या पत्रे, कौले यांनी तयार केलेल्या घरात राहाते. कोयना धरणात ४० गुंठे नव्हे, तर सुमारे ४० एकर जमीन धरणात गेल्याचे आजी सांगतात.

पोलीस भरतीत आयुष्याची शर्यत हरला; १६०० मीटर धावला, बेशुद्ध होऊन कोसळला, मग…
आजीबाई घरून तुकडा भाकर घेऊन दिवसभर आंदोलनात ठिय्या मारून बसतात. सायंकाळ झाली की आजीबाई आजारी वयोवृद्ध पतीच्या काळजीत घराकडे परतीच्या प्रवासाला निघून जातात,असा हा आजीबाईंचा दिनक्रम असल्याचं पाहायला मिळालं.

२०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा

“आमी म्हातारे झालो, आमी जिवंत असे तोपर्यंत तरी जमीन मिळेल का नाही सांगता येत नाही. परंतु आमच्या मुला बाळांना तरी जमीन सरकार देईल” या भाबड्या आशेवर अनुसया आजी वाढत्या वयाचं भान हरपून आंदोलनात आघाडीवर राहून धरणग्रस्तांचा उत्साह वाढवत आहेत. आता काही झाल तरी हटायचं नाही. मरण आलं तरी मागं हटणार नाही, जमीन मिळवणारच असा दृढ निश्चयच या आजीबाईंचा. सरकारच्या नावानं आरोळी देत आजीबाई मंत्री आमदार, खासदारांना साद घालत आहेत.

आज जरा वेगळ्या पद्धतीने करुयात, महिलेचा नकार; तरुणाने जीव घेतला, मग मृतदेहासोबत शरीरसंबंध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here