भुवनेश्वर: ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात कॉन्स्टेबल भरतीसाठी शारीरिक चाचणी देण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे. हा तरुण शारीरिक चाचणीदरम्यान १६०० मीटरच्या शर्यतीत धावत होता. धावता धावता तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे नेण्यापूर्वीच त्याचा जीव गेलेला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. लेखी परीक्षा उत्तीर्ण केली, शारीरिक चाचणीदरम्यान अनर्थ घडला

एका वृत्तसंस्थेनुसार, दीप्ती रंजन हा श्यामसुंदरपूर भागातील रहिवासी होता. ओडिशा पोलीस भरतीसाठी त्याने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. शनिवारी तो छतरपूर येथील पोलीस राखीव मैदानावर पुढील फेरीसाठी म्हणजेच शारीरिक चाचणीसाठी आला होता.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
धावता धावता अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला

येथे १६०० मीटर शर्यतीत धावताना तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्यानंतर उपस्थितांनी त्याला तात्काळ छतरपूर येथील एमकेसीजी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विधानसभेचे तालिका अध्यक्ष सुनील भुसारांना सभागृहात पोहोचायला उशीर, बेल ऐकून धावत सुटले

फिजिकल टेस्टमध्ये फीट मग अचानक बेशुद्ध झाला

गंजमचे एसपी जगमोहन मीणा यांनी सांगितले की, शारीरिक चाचणीपूर्वी त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये तो फीट आढळला. मात्र, शर्यतीदरम्यान अचानक तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

समुद्रातून भयानक प्राणी बाहेर येतील, माणसांवर हल्ला करतील, शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा रिसर्च

पोलीस व्हायचं स्वप्नं अधुरं

दुसरीकडे, तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच दीप्तीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपल्या मुलाला पोलिसात भरती व्हायचे होते, असं त्यांनी सांगितले. पण, तो आपल्याला असाच सोडून कायमचा निघून जाईल हे माहीत नव्हते, असं म्हणताना कुटुंबीयांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here