लउनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरमधील करौली आश्रमचे बाबा संतोष भदौरिया आणि एका भाविकातला झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणाने ते सध्या संपूर्ण देशात चर्चेत आले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जात होते. पण, आज ते बाबा संतोष भदौरिया म्हणून ओळखले जातात. एका मंत्राने ते त्यांच्या भाविकांवर उपचार करत असल्याचा दावा केला जातो.बाबा झाल्यानंतर काही वर्षातच संतोष भदौरिया यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे आश्रमात येणाऱ्या भाविकांना ५० रुपयांची पावती फाडावी लागत आहे. आता या बाबाने आणखी एक गोष्ट जाहीर केली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांची फी आणि असाध्य आजारांवर उपचारासाठी पैसे देता, तसेच आम्हालाही पैसे द्यावे लागतील, असं या बाबा संतोष भदौरियांनी जाहीर केलं आहे. १ एप्रिलपासून या बाबाने यज्ञ, होम हवनाचे शुल्कही वाढवले आहे.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांच्यावर एका भक्ताने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाबा संतोष भदौरिया आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू आहे. या व्हिडिओनंतर बाबा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यानंतर ते त्यांच्या दरबारात येणाऱ्या भाविकांकडून १००-१०० रुपये घेतात, अशी बातमीही प्रसारमाध्यमांमध्ये आली आहे.

देवस्थान समितीच्या सचिवाची बदली करणारा मास्टरमाईंड कोण?; दीपक केसरकरांवर शाहू प्रेमींचा मोठा रोष

आता याबाबत बाबांनी एका डॉक्टरचे उदाहरण देत सांगितलं की, लोक डॉक्टरांकडे फी भरतात, मोठ्या आजारांवर उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात, लाखो रुपये खर्च करतात. त्याचप्रमाणे येथेही शुल्क आकारले जाते. यानंतर बाबांनी तात्काळ लाभ मिळण्यासाठी १ एप्रिलपासून होम-हवनासाठी अडीच लाख रुपयांचं शुल्क आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वी हे शुल्क दीड लाख रुपये होते.

बाबा संतोष भदौरिया मारहाण प्रकरण काय?

२०१९ पर्यंत कानपूर शहराला लागून असलेले करौली इतर सामान्य गावांसारखेच होते. येथे स्थित मानवी मंदिर-लवकुश आश्रमात औषधी वनस्पतींचा वापर करुन उपचार केला जात होता. २०१९ पासून करौली बाबा येथील लोकांमधील प्रेत-आत्मा आणि अडथळे दूर करत असल्याचा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी हे आश्रम अचानक चर्चेत आलं.

कैसा ये इश्क हैं! भाच्याच्या प्रेमात मावशी आकंठ बुडाली, पतीला ओळखण्यासही नकार…
कौटुंबिक समस्यांनी वेढलेले नोएडाचे डॉ. सिद्धार्थ चौधरी काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह या आश्रमात पोहोचले. तेथे ते करौली बाबांच्या समोर आले. डॉ. चौधरींनी बाबांना चमत्कार दाखवायला सांगितलं. काही सेकंदांच्या वादावादीनंतर वातावरण तापू लागलं. बाबांच्या सांगण्यावरून या डॉक्टरला बाहेर नेऊन मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ड्रेसिंगनंतर ते आपल्या कुटुंबासह नोएडाला परतले.

१९ मार्च रोजी हे डॉक्टर पुन्हा कानपूरला आले आणि त्यांनी करौली बाबा आणि त्यांच्या लोकांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. येथूनच माजी शेतकरी नेते संतोष सिंह भदौरिया प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांना आता करौली बाबा म्हणून ओळखला जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here