नाशिक : शहरात सध्या कोयता गँगची दहशत असताना आता चक्क शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दहावीचा पेपर संपल्यानंतर मित्रांसोबत घरी जात असताना एका विद्यार्थ्यावर आठ ते दहा जणांकडून कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती स्वतः विद्यार्थ्यांने दिली आहे.दहावीचा पेपर संपल्यानंतर संबंधित विद्यार्थी मित्रांसोबत घरी जात असताना त्याच्यावर आठ ते दहा जणांनी कोयत्याने वार केला, असा दावा विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या दहावीतील विद्यार्थ्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर दोन जणही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान ,जखमी मुलाचा काही दिवसा अगोदर एका मुलासोबत किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून समोरील मुलाने आज काही मुलांना बोलावून हल्ला केला असल्याचा आरोप हल्ला झालेल्या विद्यार्थ्याने केला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान ,जखमी मुलाचा काही दिवसा अगोदर एका मुलासोबत किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून समोरील मुलाने आज काही मुलांना बोलावून हल्ला केला असल्याचा आरोप हल्ला झालेल्या विद्यार्थ्याने केला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळकरी मुलावर देखील आता कोयत्याने हल्ला होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. अगोदरच शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असताना आता याचा प्रभाव शाळकरी मुलांवरही होताना दिसून येत आहे. किरकोळ कारणातून शाळकरी मुले देखील भान विसरून अनुचित प्रकार घडवत आहेत. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
या अगोदर बऱ्याचदा शहरात महाविद्यालयीन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. परंतु आता शाळेतील विद्यार्थी देखील अशा पद्धतीने मारामाऱ्या करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिक शहरात कंपनी मॅनेजरवर हल्ला करून खून केल्याची घटना ताजी असताना आता शाळकरी मुलांमधील भांडणं चव्हाट्यावर आली आहेत.