अहमदनगर : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे जणू सूत्रच बनत चाललंय. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने महेश्वर मित्र मंडळाच्या वतीने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंचासमोर एक तरुण गौतमीसारखा डान्स करुन गौतमीला टक्कर देण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणाचं नाव पवन चव्हाण असं आहे.

ठिकठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता सुरुवातीला गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर कार्यक्रमाची दिनांक जवळ येत असताना आयोजकांच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. मात्र, तरीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची तुफान गर्दी झाली. गौतमी पाटीलचे नृत्य सुरू असताना मंचासमोर एका तरुणाने पाटलांचा बैलगाडा गाण्यावर गौतमी सारखाच डान्स करण्याचा प्रयत्न केल्याने त्या तरुणाची जोरदार चर्चा होत आहे. या तरुणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी कोपरगाव तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की, तरुणांनी प्राधान्याने हजेरी लावली असते. यावरुन कळतं की गौतमीचं तरुणांमध्ये किती क्रेझ आहे हे दिसून येतं. मग गौतमी पाटीलचा डान्स सुरु झाल्यानंतर अनेकजण थिरकायला लागतात. प्रचंड गर्दी असल्याने अनेकदा गोंधळाची स्थितीही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कार्यक्रमामध्ये पाटलांता बैलगाडा हे गाणं सुरु असताना अचानक एक तरुण डान्स करायला लागतो. अगदी गौतमी पाटीलच्या स्टेप्स फॉलो करत जशाच तसा डान्स करत असतो. व्हिडिओत दिसतंय की, स्टेजवर गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नाचत आहे. तिला टक्कर देत हा तरुण स्टेजखाली नाचत आहे. एकीकडे गौतमीचं नृत्य पाहून सर्वजण तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावपळ करतात तर दुसरीकडे तिला पाहून हा तरुण तिच्यासारखा डान्स करत आहे.

पवनवा नृत्याची आवड

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे राहणारा पवन चव्हाण हा १९ वर्षीय तरुण आहे. वडील रामसिंग हे सेंटरींग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पवनने सातवीतच शिक्षण सोडलं. मात्र, नृत्याची आवड असल्याने तो गेल्या तीन वर्षांपासून नृत्य शिकतोय. विशेष म्हणजे कुठलेही क्लास न लावता तो घरी मोबाईलवर बघूनच नृत्य शिकलाय. त्याची आवड आणि कला बघून कुटुंबिय देखील त्याला प्रोत्साहन देतात. विशेष बाब म्हणजे गौतमी पाटीलने देखील या तरुणाचं कौतुक केलं आहे.

कोपरगाव आणि आजूबाजूला छोटे-मोठे सांस्कृतिक कार्यक्रमात पवन आपली कला सादर करतो. त्याला काही पुरस्कार देखील मिळाले असून भविष्यात मोठी संधी मिळावी असं त्याचं स्वप्न आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असतानाच तिच्यासमोर पवनने ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यावर हुबेहूब नृत्य केले आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

मुंबई महापालिकेचा कॅग अहवाल सादर; बीएमसीवर ताशेरे, फडणवीसांचा इशारा, ठाकरे गटाची ही मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here