नांदेड : गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा लागत असल्याचं आपण ऐकत आलो आहे. पण आता शाळेमध्ये ही विद्यार्थ्यांच्या गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच वर्चस्वाच्या स्पर्धेतून शाळेतील विद्यार्थी खंजीर आणि एअर गन बाळगत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड शहरातील एका नामांकित शाळेमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. शिक्षकांना संशय आल्यानंतर विद्यार्थ्यांची दप्तरे तपासली असता त्यामध्ये एक एअरगन आणि चार खंजीर आढळून आले आहेत. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवले आणि हा सर्व प्रकार पालकांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा शिक्षकांसह पालक देखील अवाक झाले होते. हे सर्व विद्यार्थी उच्चशिक्षित कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अवघ्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे खंजीर आणि एअर गन आढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे..

शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादानंतर त्यातील एका गटातील विद्यार्थ्याने शंभर रुपयात खंजीर खरेदी केले. ही बाब लक्षात आल्यानंतर दुसऱ्या गटामधील विद्यार्थ्याने तीन हजार रुपये मोजून एअर गन विकत घेतले. दोन्ही गटातील विध्यार्थी मागील तीन ते चार दिवसांपासून शाळेच्या दप्तरामध्ये हे घातक शस्त्र बाळगत होते. एवढेच नाही तर शाळेतील एका विध्यार्थ्याला वाढदिवसा निमित्त पिस्टल भेट देण्याची तयारी शाळेतील विद्यार्थ्यांनी आखली होती. मात्र शिक्षकांच्या सतर्कतेमुळे त्यांचे बिंग फुटले आहे.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन गुन्हेगारांकडून पिस्टल, खंजर एअरगन सारखे घातक शस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.भाईगिरी दाखवण्यासाठी गुन्हेगार पिस्टल खरेदी करुण वर्चस्व निर्माण करत आहेत. गत वर्षी पोलिसांनी गुन्हेगारावर कारवाई करत 39 पिस्टल हस्तगत केले होते. या वर्षी आठ ते दहा पिस्टल जप्त केले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि गोळीबाराच्या घटनांनी नांदेड शहर चर्चेत आले आहे .त्यातच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याकडून खंजर आणि एअरगन वापर होत असल्याने एकच खळबल उडाली आहे.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

पालकांना लक्ष देण्याची गरज

सद्या धकाधकीच्या जीवनात पालकांचे आपल्या मुलांकडे लक्ष कमी झाले आहे. कामाच्या अधिक व्यस्ततेमुळे पालकांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले वाम मार्गाला लागत आहेत. तेव्हा आपले पाल्य काय करत आहेत, शाळेत जात आहेत की नाही, अभ्यास करत आहेत की नाही या सर्व बाबींकडे लक्ष देण्याची पालकांना गरज आहे.

बाईकसमोर बैल आडवा, तरुणाचा भीषण अपघात; नर्स पत्नीचे शर्थीचे प्रयत्न, पण काळापुढे हात टेकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here