कल्याण : रस्ते कामासाठी खड्ड्यात पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेवाळीजवळ रस्ते कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेत आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे.कल्याण पूर्वेतील कैलासनगरमधील रियान शेख (१२) हा मुलगा उभारणीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या भागात खेळत होता. खेळताना चेंडू खड्ड्यात पडल्याने रियान चेंडू काढण्यासाठी खड्ड्यातउतरला. या खड्ड्यामध्ये पाणी साचले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

नवी मुंबईतील दर्ग्याकडे मनसेचे बोट, हे अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा…; गजानन काळेंचा इशारा
स्थानिक नागरिकांची पालिका प्रशानावर नाराजी

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी रियानचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आहे. हा खड्डा खोदणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. पालिका अधिकारीही या प्रकाराला तितकेच जबाबदार आहेत, असा आरोप रहिवाशांनी केला.

मुंबई महापालिकेचा कॅग अहवाल सादर; बीएमसीवर ताशेरे, फडणवीसांचा इशारा, ठाकरे गटाची ही मागणी
नेवाळी येथील घटनेत गुन्हा दाखल….

नेवाळी नाका जवळील डावलपाडा येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर हिललाईन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या नंतर संतापलेल्या मृतांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्ग अर्धा तास रोखला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.अखेर आता हिल लाईन पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दोघांवर दाखल केला आहे.

तुम्ही माझी कॉपी करू नका, मी तर बैल आहे, बेडकाने बैलासारखं होऊ नये; बिचुकलेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here