एलियन्स ८ हजार लोकांना घेऊन जातील
त्या व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला होता की २३ मार्च रोजी एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ८००० लोकांना आपल्यासोबत घेऊन जातील. त्या व्यक्तीने त्याच्या शेवटच्या काही व्हिडिओंमध्ये सांगितले आहे की, लवकरच पृथ्वीवर डिस्टेंट्स नावाच्या एलियन्सची एक वेगळी प्रजाती येणार आहे. ते मानवाकडून पृथ्वी हिसकावून घेण्यासाठी येत आहेत. ही अशी लढाई असेल जी आपण जिंकू शकणार नाही, असंही त्याने या व्हिडिओत सांगतिले.
धीरेंद्र शास्त्री आणि माझी फक्त योगायोगाने भेट, संस्कृतीचा भाग म्हणून निमंत्रण; उमेश पाटलांचं स्पष्टीकरण
४ वर्षांनंतर आपल्याला वाचवणारे एलियन्स येतील
त्यानंतर पृथ्वीवर चॅम्पियन्स नावाची एलियन्सची एक प्रजाती देखील येईल, जी आपल्याला या एलियन्सपासून वाचवेल, असा दावाही या व्यक्तीने व्हिडिओमध्ये केला आहे. २३ मार्च रोजीच्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, त्या दिवशी एलियन्स त्यांच्यासोबत ८ हजार लोकांना वेगळ्या ग्रहावर घेऊन जातील. त्या व्यक्तीने सांगितले की गेलेल्या ८ हजार लोकांचा प्रवास खूप मोठा असेल आणि चॅम्पियन्स येण्यासाठी सुमारे ४ वर्षे लागतील आणि ते प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगवान असतील असंही त्याने सांगितलं. त्याच्या या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.