शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचं विशेष आकर्षक ठरलाय. तब्बल १२ कोटी रूपये किंमत असलेल्या या रेड्यापासून जन्मलेल्या म्हैस २५ लीटर दूध देते. इंदर नावाचा हा काळा कुळकुळीत रंग, लांब आणि भक्कम शरीर बांधा असा दिसणारा हा रुबाबदार रेडा पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत.१२ कोटी रुपये किंमतीचा रेडा या महा पशुधन एक्स्पोत आल्याचे परिसरातील शेतकऱ्यांना माहित झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. अनेकांना या रेड्याची किंमत ऐकून विश्वासच बसत नाहीये. याबाबत रेड्याचे मालक गुर्तियार सिंग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,या रेड्याच्या वीर्यातून वर्षाला ७५ ते ८० लाख रुपये उत्पन्न मिळतं.

शिर्डीत ४६ एकर जागेत भरणार ‘महापशुधन एक्स्पो’; तब्बल १० लाखांपेक्षाही जास्त पशुप्रेमींची हजेरी

इंदर नामक या रेड्याला हरियाणा आणि परीसरात विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्या दैनंदिन खानपाणावर तब्बल दोन हजार रुपयांचा खर्च होत असून हिरव्या चाऱ्यासह कडधान्य त्याची खुराक आहे. मुऱ्हा जातीची म्हैस एका वेळेत तब्बल २५ ते ३० लिटर दूध देते. या इंदरची दैनंदिन आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला जात असल्याचे इंदरचे मालक गुर्तियार सिंग यांनी म्हटले आहे.

माणसांपासून पृथ्वी हिसकावून घ्यायला एलियन्स येताहेत! २६७१ मधून आलेल्या व्यक्तीचा दावा….
साईंच्या शिर्डीत सुरू असलेल्या या देशातील सर्वात मोठ्या पशुधन एक्स्पोला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या या एक्स्पोत देशभरातील विविध जातींची जनावरे, पशु, पक्षी या ठिकाणी बघायला मिळताहेत. तर गोपालन किंवा पशु पक्षांचे पालन करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ञांचे देखील मार्गदर्शन मिळत आहे.

विशेष म्हणजे लघुउद्योगासाठी उभारलेल्या स्टॉलला मोठी गर्दी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केलीये. तीन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागासह विखे पाटलांनी जिल्हाभरातून शेतकर्यांना शिर्डीत येण्यासाठी तब्बल ५०० बसेसची व्यवस्था केलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here