पुणे: पुण्यामध्ये एक अनोखे आंदोलन सुरू असून त्याची चर्चा पुण्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे .या आंदोलनामध्ये पत्नीकडून पतीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आम्ही कुठे दाद मागायची. आमच्यावर अन्याय होतो. त्यामुळे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग की स्थापन केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. जेवढे कायदे पत्नीच्या बाजूने आहेत .तेवढेच कायदे पुरुषाच्या बाजूनेही निर्माण करणे गरजेचे आहे. नाहीतर आमचे आयुष्य हे बरबाद होणार आहे .आम्हाला विनाकारण जेलमध्ये जावं लागणार आहे असे सांगत याच कारणामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलेला आहे.भारतातील काही महिला संघटनांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यामधे वैवाहिक बलात्कारावर कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत असून ,अगोदरच महिलांच्या बाजूने एवढे कायदे आहेत. आणि पुरुषाच्या बाजूने किती कमी कायदे आहेत. हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे हा पुरुषावरचा अन्याय आहे. आणि त्याचा कायदा संसदेत चर्चिला जावा, असं या पुरुषांचं म्हणणं आहे . पुरुषांची बाजू ऐकून मगच हा कायदा करा, अशी मागणी या संस्थेचे पदाधिकारी करत आहेत.

पुण्यात रानडुकराची भाविकांच्या रिक्षाला जोरात धडक; एका भाविकाचा जागेवरच मृत्यू, तिघे जखमी
हे आंदोलन आज सकाळपासून उद्या नऊ वाजेपर्यंत सुरू असून ,असेच आंदोलन बेंगलोर मध्ये सुद्धा सुरू आहे . अनेक NRI व्यक्तींना विनाकारण चकरा माराव्या लागत आहेत .त्यांना सुद्धा सपोर्ट करणे गरजेचे आहे .पुरुष हा नेहमीच अत्याचारी असतो ही भावना चुकीची आहे. सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत .सरकारने वैवाहिक बलात्कार कायद्यावर अगोदर चर्चा करून मग तो कायदा करावा यासाठी आम्ही हे आंदोलन करत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.

प्रतिकात्मक जेल तयार करून त्यात काही पुरुष आंदोलन करत होते . तर ज्यांना विनाकारण पोटगीचे त्रास असतील, प्रॉपर्टीचे वाद असतील ,असे जे पुरुष पीडित आहेत ते पत्नीपीडित सर्व पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे महिला आयोग आहे त्याप्रमाणे पुरुष आयोग करा अशी मागणी यावेळी करण्यात आली . कायद्याची स्त्री पुरुष समानता म्हणून जी व्याख्या आहे ती पूर्ण करू शकत नाही . त्यामुळे आम्हाला न्याय द्या यासाठी हे आंदोलन करत आहोत. अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे.

खेळताना चेंडू खड्ड्यात पडला, १२ वर्षांचा मुलगा तो काढायला गेला आणि मोठा अनर्थ घडला, परिसरात हळहळ
विशेष म्हणजे या आंदोलनात ट्विटरचे अॅलन मस्क यांचा फोटो येथे ठेवण्यात आलेली आहे. त्यांना या आंदोलनात आदर्श मानण्यात आलेले आहे. त्यांना पुरोगामी म्हणण्यात आलेले आहे .त्यांची आरती सुद्धा आंदोलनस्थळी रोज केली जात आहे. मस्क यांनी आमचं म्हणणं मांडणं सोपं केलं. त्या अगोदर आम्ही जर ट्विटरवर काही मांडलं तर आमच्यावर कारवाई व्हायची. ते त्यांनी बंद केले . त्यामुळे ते आमचे आदर्श आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची आरती करून हे आंदोलन करत असल्याचं आंदोलक म्हणाले.

भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये इतके दिवस महिलांवर अन्याय-अत्याचार झालेले आपण ऐकले, परंतु आता पुरुषांवरही त्यापेक्षा जास्त अत्याचार होत आहेत. त्याचा त्रास कुटुंबाला आणि त्या पुरुषाला होतो. महिला त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे हा वैवाहिक बलात्काराचा कायद्यावर संसदेमध्ये विचार करण्यात यावा आणि त्यासाठी पुरुषांचा विचार घेण्यात यावा यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे, असेही आंदोलक पुढे म्हणाले.

नवी मुंबईतील दर्ग्याकडे मनसेचे बोट, हे अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा…; गजानन काळेंचा इशारा
काही महिला या जाणीवपूर्वक खंडणीच्या प्रकारासारखा करत कौटुंबिक त्रास देतात. त्याचबरोबर आम्ही नाही, तर कोर्ट सुद्धा म्हणते, की पुरुषाच्या बाजूने हे कायदे हवे तेवढे सक्षम नाहीत. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की वैवाहिक बलात्कार कायदा होण्याअगोदर त्याची चर्चा व्हावी. दोन्ही बाजूने त्याचा विचार व्हावा .यासाठी हे आंदोलन असल्याचे आंदोलक सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here