Gautami Patil, इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही… – indurikar maharaj indirectly targated lavani dancer gautami patil
बीड: आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तिने ३ गाणी वाजवून तीन लाख रुपये घेतले आणि आम्ही ५ हजार रुपये जास्त मागितले, तर लोक म्हणतात काय खरंय याचं, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. ते बीडमध्ये आयोजित कीर्तनात बोलत होते. बीडमधील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आपल्या शैलीत त्यांनी गौतमी पाटील हिचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. पत्नीपीडित पुरुषांचं पुण्यात आंदोलन, एलन मस्क यांना मानले आदर्श, सरकारकडे केली मोठी मागणी गौतमी पाटीलवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, ‘तिने (गौतमी पाटीलने) ३ गाणी वाजवली आणि ३ लाख रुपये घेतले. तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही आणि आम्ही ५ हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं, सगळी जनता लुटली से म्हणतात.’