सातारा :शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळीविषयी ऐकण्यात येतं. परंतु सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्‍यातील वडगाव हवेली येथे निसर्गाचा चमत्कार झालाय. येथे चक्क शेळी पालक शेतकरी अधिक महादेव ठावरे यांच्या एका शेळीने दोन तोंड आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म दिला आहे.वडगाव हवेली येथील शेळीपालक शेतकरी अधिक महादेव ठावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेळीपालनाचा व्यवसाय करतात. धनगर समाजातील असल्यामुळे त्याच्याकडून खूप शेळ्या आहेत. ते परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेळ्या बसवतात, तर कधी चरायला घेऊन जातात. पन्नासहून अधिक शेळ्या असणाऱ्या अधिक महादेव ठावरे यांच्याकडे असणाऱ्या एका शेळीने एका अनोख्या कोकरास जन्म दिला आहे.

इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही…
दररोज शेळ्यांना चरून आणल्यानंतर त्यांना अधिक ठावरे आपल्या गोठ्यात सोडतात. त्यांच्याकडे असणाऱ्या शेळीपैकी एक शेळी गर्भवती होती. त्यांनी ते इतर शेळीप्रमाणे गर्भवती शेळीचीही काळजी घेत होते. दोन दिवसापूर्वी त्यांच्याकडे असणाऱ्या एका शेळीने अनोख्या कोकरास जन्म दिला. या कोकराचे वैशिष्टये म्हणजे त्याला दोन तोंडे असून चार डोळे आहेत. त्यांच्या या शेळीच्या कोकराची वडगाव हवेलीसह पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

पत्नीपीडित पुरुषांचं पुण्यात आंदोलन, एलन मस्क यांना मानले आदर्श, सरकारकडे केली मोठी मागणी
या घटनेबाबत कराड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर बोडरे यांना विचारला असता, ते म्हणाले, ‘दुहेरी गर्भाधारणात दोन शुक्राणू पेशींचा समावेश होतो. एक अंड्याच्या पेशीला झिगोट तयार करण्यासाठी फलित करतो, तर दुसरा दोन ध्रुवीय केंद्रकांशी जोडतो. ज्यामुळे एंडोस्पर्म तयार होते. अंडाशयमध्ये विकसित होत असताना दुहेरी गर्भाधारणेला उत्तेजन मिळते. त्यामुळे दुहेरी फलन होऊन दोन तोंडाचे आणि चार डोळ्याची करडू जन्मास आले आहे. ही हजारात एक घटना घडत असते. ही घटना सारखी सारखी पाहण्यास मिळत नाही.’

पुण्यात रानडुकराची भाविकांच्या रिक्षाला जोरात धडक; एका भाविकाचा जागेवरच मृत्यू, तिघे जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here