मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. घराघरांमध्ये पाणी शिरले असून वृक्षही उन्मळून पडले आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबईकरांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे, असं पालिकेने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.
लाटा उसळणार
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून समुद्रास दुपारी १२:४७ वाजता भरती आहे. मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे, असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील दौलत नगर भागातील दहिसर नदीला पूर आला असून नदीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे.
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्रभर जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वे बंद झाली आहे. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कामगारांचे हाल झाले आहेत. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने बेस्टनेही वाहतुकीचे आठ मार्ग बदलले आहेत. मुंबईत २३० मिली मीटर ते पश्चिम आणि पूर्व उपनगरात १६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कांदिवलीत पश्चिम द्रुतगती मार्गावर डोंगराचा काही भाग कोसळला. एका कार समोरच हा भाग कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरू आहे.
मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाण्यात घोडबंदर येथे पाणी साचल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
४८ तास रेड अॅलर्ट
येणाऱ्या ४८ तासात मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांना कारण नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I really like and appreciate your blog post.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.