म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : समुद्रावरून शनिवारी आलेल्या वाऱ्यांनी मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट झाली. मुंबईला मिळालेला हा तापमानदिलासा पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात आर्द्रतेमुळे उकाडा जाणवू शकेल, मात्र तापमानात फारशी वाढ अपेक्षित नाही. उर्वरित राज्यात मात्र तापमान वाढ होऊ शकते.सांताक्रूझ येथे शनिवारी ३०.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान शुक्रवारपेक्षाही कमी होते. मार्चमध्ये काहिली अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा ३० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान उतरल्याने मार्चचे शेवटचे दिवस थोडे सुसह्य होतील, अशी अपेक्षा आहे. शनिवारी सांताक्रूझ येथे नोंदले गेलेले कमाल तापमान हे सरासरीपेक्षा २.१ अंशांनी कमी होते. कुलाबा येथे ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा केवळ ०.२ अंशांनी कमी होते. वायव्य आणि पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यांनी किमान तापमानातही घट झाली. सांताक्रूझ येथे शनिवारी २०.५ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे २२.१ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. दोन्ही केंद्रांवर कमी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी नोंदले गेले.

निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म

‘मार्चअखेरपर्यंत कमाल तापमानाचा पारा मुंबईत फार चढणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. ३० मार्चच्या आसपास पश्चिमी प्रकोपामुळे वातावरणात थोडा फरक पडू शकेल. मात्र हा पश्चिमी प्रकोप कोणत्या पट्ट्यात आहे, यावर परिस्थिती अवलंबून असेल. २१ मार्चच्या आसपास पश्चिमी प्रकोप, पश्चिमेकडून येणारे वारे, यामुळे मुंबईत पाऊस पडला. पण सध्या पश्चिमेकडून येणारे वारे आर्द्रता घेऊन येणारे नसल्याने पाऊस पडणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘२७ ते ३० मार्चदरम्यान पीक काढा’

मुंबईसह कोकणातील वातावरण सध्या निवळले आहे. मध्य महाराष्ट्रातील वातावरण रविवारपासून निवळू शकते, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी २६ मार्चला गडगडाट होऊ शकतो. २७ ते ३० मार्चदरम्यान शेतकऱ्यांनी पीक काढावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. मुंबई वगळता उर्वरित राज्यामध्ये कमाल तापमान वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. ही तापमानवाढ चार अंशांपर्यंत जाऊ शकते.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here