ठाणे: तडीपारीची नोटीस बजावून अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष यांना विरोधी पक्षातील काही नेत्यांकडूनही पाठिंबा मिळताना दिसतोय. माजी खासदार यांनी जाधव यांना धीर देताना राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

वसई-विरार महापालिकेतील आंदोलनाप्रकरणी जाधव यांना विरार पोलिसांनी दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावली होती. त्यानंतर ठाणे महापालिका मुख्यालयसमोर परिचारिकांसाठी आंदोलन करत असताना त्यांना ताब्यातही घेण्यात आलं. त्यांचा जामीन अर्जही फेटाळला गेला आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अविनाश जाधव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘मी सोबत आहे’ असं म्हणून जाधव यांना धीर दिला आहे.

जाधव यांच्यावरील कारवाईवरून शिवसेना व मनसेच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. तर, शिवसेनेनंही आपल्या स्टाइलनं उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं राजकारण तापलं असताना आता नीलेश राणे यांनी ट्वीट करून जाधव यांना पाठिंबा दिला आहे.

वाचा:

‘अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं म्हणून त्यांना अटक करण्यात आलं. दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. दुसरीकडं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो. पण त्याच्याविरोधात साधी तक्रारही दाखल केली गेली नाही,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. ‘संधी सगळ्यांना मिळते, ही गोष्ट राज्य सरकारनं विसरू नये,’ असा इशाराही नीलेश यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here