नांदेडः लग्नाला आलेल्या मुलींच्या लग्नाची चिंता त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर या विवंचनेतून एका पित्याने स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पांगरी तांडा येथे ही हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. नंदू बाबुराव जाधव असं या मयत तरुणाचे नाव आहे. ३७ वर्षीय नंदू जाधव हा खासगी शैक्षणिक बस चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला लग्नाला आलेल्या दोन मुली देखील होत्या. लॉकडाऊनच्या काळात त्याने लोकाकडून कर्ज देखील घेतले होते. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. वाढती महागाई त्यातच लोकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि दोन्ही मुली लग्नाला आल्यामुळे तो मागील काही महिन्यांपासून चिंतेत होता. याच चिंतेतून नंदू जाधव याने शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर डिझेल टाकून पेटवून घेतले.

किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल
या घटनेत तो ९० टक्के भाजला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या घटनेने पांगरी गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश बोदगिरे हे तपास करीत आहेत.

संजय राऊतांनी आम्हाला साथ दिली पण त्यांचा आवाज दाबला जातोय; बार्शीतील निर्भयाच्या आईचा टाहो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here