परशुराम घाटात १.२० किमी लांबीत उंच डोंगररांगा, खोलदऱ्या असल्या कारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरुपाचा आहे. उर्वरीत १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या मार्गात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने सदर भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे. उर्वरीत १०० मीटर मधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे आहे.
सदर ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली कार्यरत महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सदर प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या में.कशेडी परशुराम हायवे प्रा.ली.यांनी या ठिकाणाच्या कामासाठी परशुराम घाट वाहतूकीसाठी दि. २७ मार्च २०२३ ते दिनांक ०३ एप्रिल २३ या कालावधीत ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यासाठी व संभाव्य जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी परशुराम घाट दि. २७ मार्च २०२२ ते दिनांक ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत दु. १२.०० संध्याकाळी ६.०० वाहतुकीसाठी बंद ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे.
सदर बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवण्यात यावी तसे आदेश देण्याची विनंती पेण रायगड विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ मार्च रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या पावसात हा घाट धोकादायक बनला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर्षीही या पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागू नये, यासाठी परशुराम घाटात काम युद्धपातळीवरती सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने किमान ७ दिवस घाट बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सज्ज करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी दिली होती. चिरणी आंबडस या पर्यायी मार्गाला प्रमुख जिल्हामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या मार्गाच्या अपग्रेडेशनचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.