नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं असतानाच नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील काही पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामध्ये तीन माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आणि नाशिकची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संजय राऊत नाशिक जिल्ह्यात असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.नाशिकच्या मालेगावमध्ये आज सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे हे नाशिकला येण्यापूर्वीच नाशिक महानगरपालिकेतील दोन माजी नगरसेवक व एक माजी नगरसेविका तसेच तीन महिला जिल्हा आघाडीप्रमुख, विद्यमान उपमहानगरप्रमुख आणि काही कार्यकर्त्यांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. एकीकडे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत सभेसाठी नाशिकमध्येच गेल्या दोन-तीन दिवसांपासून तळ ठोकून असताना दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.

मला तिला मारायचं नव्हतं, पण…; १८ वर्षीय तरुणीच्या खुनाचा चेतन गाला याला पश्चाताप

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ज्या ज्या वेळी संजय राऊत हे नाशिकमध्ये यायचे त्यावेळी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचा व माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश व्हायचा. त्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असताना पुन्हा ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता स्वतः उद्धव ठाकरे सभेसाठी नाशिकमध्ये येण्यापूर्वीच त्यांना शिंदे गटाकडून धक्का देण्यात आला आहे.

हे नेते करणार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उत्तम दोंदे – माजी नगरसेवक, प्रभाकर पाळदे-माजी नगरसेवक, शरद देवरे-माजी उपमहानगरप्रमुख, अॅड. श्यामला हेमंत दीक्षित- माजी नगरसेविका, शोभा गटकाळ-महिला आघाडी जिल्हाप्रमुख, मंगला भास्कर-महिला आघाडी जिल्हाप्रमुख, शोभा मगर- महिला आघाडी जिल्हाप्रमुख, अनिता पाटीस, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील आणि शशिकांत कोठुळे माजी सभापती, शिक्षण मंडळ, नाशिक महानगर पालिका तसेच विद्यमान उपमहनगर प्रमुख शिवसेना व माजी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, विद्यार्थी सेना यांच्यासह इतर काही नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here