मुंबई : कांजूरमार्गमधील कर्वेनगर येथील म्हाडा कॉलनीतील इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. आगीनंतर घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवण्यात आले, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. या घटनेत आगीच्या धुरामुळे काही नागरिकांचा श्वास गुदमरला.कांजूरमार्ग पूर्व येथे कर्वे नगर याठिकाणी असलेल्या म्हाडाच्या ( P-2 Building ) १४ मजली इमारतीला इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आज सकाळी भीषण आग लागला. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आलेल्या ३ गाड्यां आगीवर नियंत्रण मिळवलं. पण आगीमुळे धुराचे लोट परिसरात पसरले. यात या इमारतीमधील ५ महिलांचा श्वास गुदमरला. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आग नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरू करण्यात आले.
मला तिला मारायचं नव्हतं, पण…; १८ वर्षीय तरुणीच्या खुनाचा चेतन गाला याला पश्चाताप
ही आग इलेक्ट्रिक वायरिंगपर्यंतच मर्यादित होती. तळमजल्यावरील कॉमन इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि ग्राउंड प्लसवरच्या १४ मजल्यांच्या निवासी इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग मर्यादित होती. या आगीवर सकाळी १० वाजता पूर्णपणे नियंत्रणात आली. या घटनेतील जखमींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. धुरामुळे श्वास कोंडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

आधी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली, मग म्हणाले संसदीय शब्द आहे हा !

जखमींची नावं

१. विमल जालिंदर साकटे (वय ७४)
२. अल्का साकटे (वय ४०)
३. नताशा साकटे (वय १३)
४. अंजली मालवणकर (वय ६०)
५. करुणा उबाळे (वय ६५)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here