बीड : काल परळी तालुक्यातील उड्डाणपूल परिसरात एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, ही घटना कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस या घटनास्थळी दाखल होऊन त्या घटनेची आणि त्या स्थळाची पाहणी केली. प्राथमिक अंदाजात पोलिसांनी हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला. मात्र, हा अंदाज शेवटी खरा ठरल्याने काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत जेल बंद केलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल परळीतील रेल्वे उड्डाण पुलावर एक दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. यामध्ये तालुक्यातील डांबी या गावातील संपत्ती भारत पारवे वय वर्ष २३ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर यात निकम केरबा एगडे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला प्राथमिक उपचार परळीत जिल्हा रुग्णालयात देऊन पुढे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात पुढील उपचार चालू आहेत. हा अपघात घडताच स्थानिक लोकांनी पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली.

भर रस्त्यात अडवलं, तलवार, लोखंडी रॉड अन् दांडक्याने बेदम मारलं; वादाचं कारण वाचून पोलीसही हादरले…
यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. पाहणी करत असताना काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच ठिकाणी हा अपघात नसून हा घातपात असल्याचं वर्तवलं होतं. मात्र, पोलिसांनी आपली तपास यंत्रणा फिरवत या गोष्टींचा सगळा तपास केल्यावर हा खून असल्याचा निदर्शनास आलं. काही तासातच या सगळ्या मागचा सूत्रधार अंबाजोगाईत असल्याचं माहिती होताच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळून जेर बंद केलं आहे. हा प्रकार का झाला विचारणा केली असता हा प्रकार छेडछाडीतून झाल्याचं समोर आलं आहे.

वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल…
मयत व्यक्तीने गावातच भावजय होत असलेल्या एका महिलेची छेड काढली होती. त्याचाच राग मनात धरून त्याच स्त्रीच्या दिराने पूर्व नियोजन करून हा अपघात घडून आणण्याचा पोलीस तपासात पुढे आलं. त्यानंतर या आरोपीच्या अंबाजोगाई येथे मुसक्या ओवळत जेर बंद केलं आहे. मात्र, या प्रकरणात आणखी काय गूढ उलगडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Crime Diary: शेतात बाजरी चांगली उगवली पण अचानक आले पोलीस अन्…, पत्नीच्या मृतदेहासोबत पतीचा रक्तरंजित खेळ

महिला-पुरुषांसाठी एकच बाथरुम; भाड्याच्या घरात असलेलं पोलीस ठाणे अडचणीत, कर्मचारी हतबल

2 COMMENTS

  1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. while well as but thank god, I had no issues. such as received item in a timely matter, they are in new condition. an invaluable so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    original louis vuittons outlet https://www.louisvuittonsoutletonline.com/

  2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. and also but thank god, I had no issues. similar to the received item in a timely matter, they are in new condition. situation so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    authentic cheap jordans https://www.realjordansretro.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here