कोल्हापूर: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढून देणारे यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकीची दखल घेऊन टिळकवाडी पोलिसांनी त्यांना पोलीस बंदोबस्त दिला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे चार मुहूर्त पंडित शर्मा यांनी काढून दिले होते. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त बेळगावचे पंडित विजयेंद्र शर्मा यांनी काढून दिला होता.आता राम मंदिराचे भूमिपूजन बुधवारी होणार आहे. पण मुहूर्त काढून दिलेले पंडित विजयेंद्र शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत.
रेल्वे ओव्हरब्रिज जवळील श्री राघवेंद्र नववृंदावनचे प्रमुख असलेले पंडित शर्मा यांच्या मठाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून हे फोन आले आहेत.

वाचा:

अयोध्येतील राम मंदिराचे ट्रस्टी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी शर्मा यांच्याशी संपर्क साधून राममंदिर भूमिपूजनासाठी शुभ मुहूर्त काढून देण्यास सांगितले होते. त्यानुसार शर्मा यांनी त्यांना चार शुभ मुहूर्त पाठवले होते. २९ जुलै सकाळी नऊ नंतर, ३१ जुलै सकाळी सात ते नऊ दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा नंतर आणि ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असे ते चार मुहूर्त होते. त्यापैकी पाच ऑगस्टचा मुहूर्त राम मंदिर भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आला आहे. जून १५ रोजी हे चार मुहूर्त स्वतः पत्र लिहून शर्मा यांनी स्वामी गोविंद देवगिरी महाराज उर्फ किशोरजी व्यास यांना कळवले होते.

वाचा:

राम मंदिराच्या भूमिपूजन मुहूर्तावरून मतभेद

भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून मतभेद आहेत. अनेक साधूंसह काशीतील ज्योतिष्यांनी देखील राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा मुहूर्त अशुभ असल्याचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती (Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांनी देखील यापूर्वी म्हटले आहे. त्याआधी त्यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवर राम मंदिराच्या भूमिपूजनाची तिथी, अर्थात ५ ऑगस्ट हा दिवस अशुभ दिवस असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here