Jalgaon Crime: लहान भावानं मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना जळगावात घडली आहे. भावाचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय लहान भावाला होता. याच संशयातून त्यानं भावाची हत्या केली.

 

jalgaon crime
जळगाव : पत्नीचे मोठ्या भावाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन लहान भावाने मोठ्या भावाला शेतात आधी विळ्याने जखमी केले. त्यानंतर रुमालाने गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना चोपडा तालुक्यातील मितावली गावाजवळ पारगाव शिवारात शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. संदीप प्रताप पाटील (वय ४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयित लहान भाऊ सतीश प्रताप पाटील (वय ३८) यास अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील मितावली गावात संदीप पाटील व सतिष पाटील हे दोघे भाऊ कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून लहान भाऊ सतीशला त्याच्या पत्नीचे संदीपशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. गुरुवारी मोठा भाऊ संदीप हा त्यांच्या पारगाव शिवारातील शेतात गेला होता. पत्नीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयामुळे सतीशचा मोठा भाऊ संदीपवर प्रचंड राग होता. या रागाचा गुरुवारी भडका उडाला. संदीप एकटा असल्याची संधी साधत सतीश शेतात गेला. संदीपला काही कळण्याच्या आत सतीशने संदीपच्या पोटावर विळा मारुन त्यास जखमी केले. त्यानंतर रुमालाने गळा आवळून सतीशने संदीपचा जीव घेतला.
७ रुम, १२ बेड्स, १६ बाटल्या, ‘ती’ पाकिटं; प्रसिद्ध शाळेवर अचानक धाड; आत नेमकं काय चालायचं?
मितावली गावात खळबळ; संपूर्ण गाव सुन्न
घटनेची माहिती मिळाल्याननंतर अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा केला. चोपडा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनीही घटनास्थळ गाठून माहिती जाणून घेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याबाबत मितावली येथील सोपान भावलाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन अडावद पोलीस ठाण्यात सतीश प्रताप पाटील याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित सतीश पाटील यास अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा करत आहेत. दरम्यान लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याच्या घटनेने मितावली गावात मोठी खळबळ उडाली असून गाव सुन्न झाले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here