: एकाच कुटुंबातील चौघांनी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चौघांनी विष प्राशन करून आयुष्याची अखेर केली. सतीश, त्यांची पत्नी वेधा आणि त्यांची दोन मुलं, निशिकेत (९) आणि निहाल (५) अशी मृतांची नावं आहेत. शहरातील कुशाईगुडा परिसरात चौघे वास्तव्यास होते. एका अपार्टमेंटमध्ये हे कुटुंबा राहत होते. आपल्या राहत्या घरातच त्यांनी आयुष्याचा शेवट केला. शुक्रवारी रात्री चौघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. घटनेची माहिती पोलिसांना शनिवारी दुपारी मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘कंडीगुडा परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली. पती, पत्नी आणि दोन मुलं यांचा मृतांमध्ये समावेश आहे. दाम्पत्याची दोन्ही मुलं आजारी होती. त्यांना मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे पती-पत्नी तणावाखाली होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे,’ असं कुशाईगुडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पी. व्यंकटेश्वरलू यांनी सांगितलं. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना शनिवारी दुपारी मिळाली. त्यांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here