वेगवेगळ्या क्लिप करून नराधमाने त्याच्या लॅपटॉपमध्ये ठेवल्या होत्या. दरम्यान लॅपटॉप खराब झाल्याने तो दुरुस्तीला गेल्यावर या क्लिप बाहेर समोर आल्या आणि व्हायरल होऊ लागल्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मुरगूड परिसरातील अनेकांच्या मोबाईलवर व पेन ड्राईव्हवरून फिरत होत्या. परंतु घाबरून कुणीही तक्रार केली नव्हती. मात्र शनिवारी त्यासंबंधी चारशेहून अधिक निनावी पत्रे समोर आले. पीडित महिलांनी शहरातील अनेकांना एकाच वेळी पोस्टाद्वारे ही पत्र पाठवल्यामुळे दबक्या आवाजातील चर्चेला जाहीर स्वरूप आले. तर शहरातील प्रमुख राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना या व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह पोस्टाने अज्ञातांनी पाठवून दिले आहे. तसेच कठोर कारवाई करावी अशी मागणीही होऊ लागली आहे.
काय आहे पत्रात?
पत्रात लिहिले आहे की, मुरगूडचे नाव आता वेगळ्या कारणासाठी गाजत आहे. येथील बोगस डॉक्टरने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या अश्लील चाळ्यांचे चित्रण करून मुरगुडीचे नाव बदनाम केलं आहे. डॉक्टर हा रुग्णाच्या दृष्टीने देव माणूस असतो. परंतु, या बोगस डॉक्टरने आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या आडून हा गैरप्रकार करून या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना कलंक लावला आहे. सर्व देश महिला दिन साजरा करत महिलांचा सन्मान करून त्यांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करत आहे. मात्र आपल्या मुरगूडमध्ये महिला सुरक्षित नाहीत असा संदेश या घटनेमधून जात आहे. अशा प्रकारचे अश्लील चाळे चित्रण करून ते जतन करून ठेवणाऱ्या विकृत प्रवृत्तीस आपण सर्व मुरगूडकर कायमचा धडा शिकवूया. जेणेकरून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना आपल्या मुरगूडमध्ये होणार नाहीत याची खबरदारी आपल्यावर आहे. या बोगस डॉक्टरला पाठबळ देणाऱ्यांचा सुद्धा आपण सर्वजण कायमस्वरूपी बंदोबस्त करून मुरगूड शहरात महिला सुरक्षित आहेत, असा संदेश सगळे पाठवूया. दरम्यान, मुरुगुडमधील अनेक महिला भगिनी असा उल्लेख पत्राच्या शेवटी करण्यात आला आहे.
मी डेअरिंग केली आणि नाचलो; मोलमजुरी करणाऱ्या आई-बापाच्या लेकानं लावणीमध्ये गौतमीलाही मागे टाकलं