नवी मुंबईः वडील साताऱ्यात मुलगी नवी मुंबईत दोघंही फेसबुक व्हिडिओ कॉलवर बोलत होते. अचानक लेकीने वडिलांसमोरच गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. नवी मुंबईतील कामोठे येथे ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडितेच्या पतीकडून आणि नणंदेकडून सातत्याने तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. एश्वर्या खोत असं या तरुणीचं नाव असून वडिलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना तिने मला स्वातंत्र्य हवे आहे, असं म्हणत ती तिच्या लॅपटॉपपासून दूर गेली आणि थोड्यावेळातच ऐश्वर्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली.

ऐश्वर्याचा लक्ष्मण खोत याच्याशी जानेवारीत विवाह झाला होता. लग्नानंतर लक्ष्मण तिचा छळ करत होता. नवीन घर घेण्यासाठी तिच्या पालकांकडून सोने आणि रोख रक्कम घेऊन ये असा तगादा त्याने लावला होता, असं तिच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केलं आहे. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

एसटीच्या सवलती वाढवल्या, पण गाड्या कुठे?, प्रवाशांनी महामंडळाकडे केली मागणी
लक्ष्मणची बहिण वर्षा बेलदार हिनेच हुंडा मागण्यासाठी चिथवले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसंच, लक्ष्मणचे त्यांची नातावेईक पल्लवी बेलदार याच्यासोबत अफेअर होतं. तसंच, ऐश्वर्याला त्यांच्या संबंधांबाबत कळल्यानंतर दोघांनी तिला शिविगाळ केल्याचा आरोप पिडीतेच्या वडिलांनी केला आहे. लग्न झाल्यापासून ऐश्वर्याचा मानसिक आणि शारिरक मानसिक छळ होत होता. तसंच, गेल्या तीन महिन्यांपासून ती तिच्या वडिलांच्या घरी राहत होती.

तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म, तरीही घरात आनंद नाही, कारण ठरली लेकाची जन्मरास, बापाचा भलताच गैरसमज
पीडीतेचे वडील लक्ष्मणची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता तिच्या सासरच्यांनी अजून मौल्यवान वस्तू देण्याचा आग्रह केला. मात्र, पाटील यांनी अजून पैसे देण्यास नकार दिला. तसंच, मला अजून तीन मुली आहेत, असं म्हणत त्यांचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ऐकलं नाही.

गुरुवारी ऐश्वर्या वडिलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना अचानक कॉल बंद झाला असता त्यांनी लक्ष्मणला फोन केला. मात्र, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर लक्ष्मणने स्वतःच फोन करत ऐश्वर्याने गळफास घेत जीवन संपवल्याचे सांगितले. ऐश्वर्याच्या वडिलांनी तिच्या नवऱ्यावर संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here