मुंबई: मुंबईत सुरु असलेली महिला प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात एका बाजूला मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स आणि दुसऱ्या बाजूला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आहे.हा सामना ऐतिहासिक असणार आहे आणि सामना जिंकणार आहे तो या महिला प्रीमियर लीगची ट्रॉफी पटकावणारा पहिला संघ बनेल. हा सामना घरबसल्या आरामात बघता येईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील विनामूल्य आहे. स्पोर्ट्स १८ चॅनलवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील WPL २०२३ चा विजेतेपदाचा सामना थेट पाहू शकता. तर जिओ सिनेमा अॅपवर या अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

हार्दिकची कॅप्टन्सी जाणार? स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी डायरेक्टर सोलंकींचे मोठे वक्तव्य
गोलंदाज किंवा फलंदाज कोणाचं वर्चस्व

ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी चांगली आहे आणि फलंदाजीला अनुकूल आहे. पण खेळपट्टीवर खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करेल आणि फिरकी गोलंदाजांनाही मदत करेल. या खेळपट्टीवर दुसऱ्यांदा फलंदाजी करणे हा संघासाठी चांगला निर्णय ठरू शकतो.

WPL मधील मुंबई आणि दिल्लीचा प्रवास

मुंबईने WPL मध्ये ९ सामने खेळले असून ७ सामने जिंकले आहेत. संघाला २ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने ९ सामन्यात २३.२५ च्या सरासरीने २५८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १२७.०९ आहे.

तर दिल्लीने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. संघाने ६ सामने जिंकले आहेत. संघाला २ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाची कर्णधार मेग लॅनिंगची कामगिरी अप्रतिम आहे. तिने ८ सामन्यात ५१.०० च्या प्रभावी सरासरीने ३१० धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १४१.५५ आहे.

इसी वाँगने इतिहास घडवला, WPLमध्ये पहिल्या हॅटट्रिकची नोंद; मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशा असू शकतात

मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, नताली सिव्हर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर,पूजा वस्त्राकर, ईसी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जीर्तीमानी कलिता, सायका इशाक

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन

मॅग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मरीजनने कप्प, जेस जॉन्सन, अरुंधती रेड्डी, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here