अंकितनं कॉल उचलला. त्यावेळी त्याचा श्वास सुरू होता. त्याला धाप लागत होती. त्यानं हॅलो म्हटलं. तेव्हा चित्रानं बऱ्याच वेळानंतर त्याला उत्तर दिलं. यातूनही (विष प्यायल्यानंतरही) वाचला असशील तर फास लावून घे, असं चित्रा म्हणाली. त्यावर, अजून काही पाजयाचं असेल तर तेही पाज, असं अंकितनं म्हटलं. यावर असाच जीव दे, असं उत्तर चित्रानं दिलं.
आणखी एका कॉल रेकॉर्डिंगनुसार चित्रानं अंकितला बोलवण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकल्याचं स्पष्ट होतं. १६ मार्चला येतो असं अंकित कॉलवर म्हणाला होता. चित्रानं अंकितच्या हत्येची योजना आधीपासूनच आखली होती हे या कॉलमधून स्पष्ट झालं आहे. छातीठोकपणे ये आणि छाती पिटून घे, असं चित्रा या कॉलमध्ये म्हणाली. याबद्दल अंकितनं विचारणा केली असता तिनं विषय बदलला.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
अंकितचा चुलतभाऊ शैलेशनं चित्रा, तिचा पती हेमंत यांच्याविरोधात बुलंदशहर पोलीस ठाण्यात आणि चित्राचे भाऊ अमित आणि सनी यांच्याविरोधात एटामध्ये तक्रार दाखल केली आहे. चित्रा आणि अंकित यांचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचं होतं. मात्र चित्राचं कुटुंब तयार नव्हतं. त्यांनी तिचं लग्न बुलंदशहरात राहणाऱ्या हेमंतशी केलं. चित्राच्या भावांनी अंकितला संपवण्याचा पण केला. त्यांनी १२ मार्चला चित्राकडून त्याला फोन लावून घेतला. चित्रानं अंकितला भेटायला बोलावलं. १६ मार्चला नारायण नगरात त्याला विष पाजण्यात आलं.